IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या आईच्या नावे असलेली कंपनी सील

मालमत्ताकर थकबाकी असलेल्यामुळे 'थर्मोव्हेरिटा' कंपनी सील
'Thermoverita' Company Seal in the name of Manorama Khedkar
मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेली 'थर्मोव्हेरिटा' कंपनी सीलPudhari Photo

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा : पूजा खेडकर यांच्या अडचणीत अजुन वाढ झाली आहे. सकाळी केंद्रीय लोकसेवा आयोगाने त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तर आता त्यांच्या आईच्या नावावर असलेली तळेगाव येथील कंपनी सील केली आहे. तळवडे गावठाण आणि ज्योतिबानगर येथे थर्मोव्हेरिटा प्रायव्हटे लिमिटेड ही कंपनी आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोराम खेडकर यांच्या नावाने ती कंपनी आहे. त्यामुळे कंपनी वादाच्या भोव-यात अडकली आहे. महापालिकेने यासंदर्भातची सर्व कागदपत्रे तपासली आहेत.

'Thermoverita' Company Seal in the name of Manorama Khedkar
IAS Ofiicer| पूजा खेडकरांविरुद्ध महसूल संघटनेतून कारवाईची मागणी

या कंपनीमार्फत 2009 पासून व्यावसायिक कर भरला जात होता. शेवटचा कर 2022 मध्ये भरण्यात आला होता. त्यानंतर औदयोगिक मालमत्ताकर भरलेला नाही. त्यामुळे महापालिकेने हे ठोस पाऊस उचलले आहे. कंपनीने 2 वर्षामधील एकूण 2 लाख 88 हजार 781 रूपयांचा कर थकविला आहे. त्यामुळे नियमानुसार मालमत्ता जप्त करण्याची कारवाई पोलिस बंदोबस्तात महापालिकेने केली आहे.

'Thermoverita' Company Seal in the name of Manorama Khedkar
वादग्रस्त IAS पूजा खेडकरची आई मनोरमा पोलिसांच्या जाळ्यात कशी सापडली?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news