औरंगाबाद : ख्रिश्चन धर्माचा त्याग करून ५३ जणांचा हिंदू धर्मात प्रवेश - पुढारी

औरंगाबाद : ख्रिश्चन धर्माचा त्याग करून ५३ जणांचा हिंदू धर्मात प्रवेश

पैठण (औरंगाबाद); पुढारी वृत्तसेवा

जालना जिल्ह्यातील- मंठा तालुक्यातील दहा कुटुंबातील ५३ महिला, पुरुषांनी बालकांसह ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला. ही हिंदू धर्मवापसी (शनिवार) पैठणच्या संत एकनाथ महाराज मंदिरात करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी ख्रिश्चनधर्म स्वीकारलेल्या कुटुंबियांनी हिंदू धर्मात वापसी करण्याचा निर्णय घेतला. या निमित्त सर्व परिवाराचे स्वागत पूजनाचा कार्यक्रम प्रफुलबुवा तळेगावकर महाराज ह.भ.प रघुनाथ महाराज पालखिवाले, ह.भ.प रावसाहेब महाराज गोसावी, कमलाकरगुरु शिवपुरी, योगेश महाराज पालखिवाले, भारतीय जनता पार्टीची प्रदेश महिला आघाडी प्रमुख रेखाताई कुलकर्णी, शालिवाहन पतसंस्थेचे चेअरमन किशोर चौहान, अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष समिर शुक्ल, दाजी अंबेकर, शाम पंजवाणी, धर्म जागरण विभागाचे संजयजी वालतुरे, शामजी यादव यांच्या हस्ते विधिवत पूजन करून संपन्न झाला.

सर्व धर्मांतरीत परिवाराचे शाल श्रीफळ देऊन विधीवत हिंदू धर्मात वापसी करून स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे नियोजन पैठण ब्राह्मणसभा अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी केले होते.

दरम्यान, ख्रिश्चन धर्म काही दिवसांपूर्वी स्‍वीकारलेल्‍या कुटुंबियांना मुळातच हिंदू धर्माची आवड कायम राहिल्यामुळे या कुटुंबियांनी पुन्हा हिंदू धर्मात वापसी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे प्रथम टप्प्यात ५३ जणांना विधिवत हिंदू धर्मात प्रवेश करून घेण्यात आले. दि ५ जानेवारी रोजी आणखी ६५ पुरुष महिलांसाठी दक्षिण काशीचे धर्मपीठ म्हणून ओळख असलेल्या पैठण येथे हिंदू धर्मवापसी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ब्राह्मण सभेचे नियोजन सुरू असल्याची माहिती ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.

हे वाचा :

Back to top button