औरंगाबाद : थाप मारून मोबाइल लांबविला | पुढारी

औरंगाबाद : थाप मारून मोबाइल लांबविला

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : बॅलन्स संपला असून, मित्राला फोन करायचा असल्याची थाप मारून दोघांनी तरुणाचा मोबाइल घेऊन धूम ठोकली. ही घटना 18 ऑगस्ट रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास कार्तिकी सिग्नल, समर्थनगर रोडवर घडला.

पोलिसांनी सांगितले की, नटराज देविदास खांडवी (32, रा. चंडिकापूर, जि. नाशिक, ह. मु. हॉटेल कार्तिकी) हा मोबाइलवर बोलत रस्त्यावर उभा होता. तेव्हा दोघेजण तिथे आले. त्यांनी बॅलन्स संपला असून, मित्राला फोन करायचा असल्याचे सांगितले. खांडवी यानेदेखील मदत म्हणून त्यांना मोबाइल दिला. मात्र, दोघांनी मोबाइल हातात घेताच तेथून धूम ठोकली. याप्रकरणी क्रांती चौक
पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button