Ind Vs Eng 2nd ODI : सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेद्रसिंग धोनीसह दिग्गजांची लॉर्ड्सवर हजेरी | पुढारी

Ind Vs Eng 2nd ODI : सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, महेद्रसिंग धोनीसह दिग्गजांची लॉर्ड्सवर हजेरी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड (Ind Vs Eng 2nd ODI) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (१४ जुलै) लॉर्ड्सवर सुरू झाला. या मालिकेत टीम इंडिया आधीच १-० ने आघाडीवर आहे. भारत हा सामना जिंकून मालिका विजयावर भर देणार आहे. या लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर हा सामना पाहण्यासाठी अनेक दिग्गजांनी मैदानात हजेरी लावली.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर लॉर्ड्सच्या स्टँडमध्ये बसलेले दिसले. सचिन आणि सौरव ही त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी सलामी जोडी होती. या जाेडीने इंग्लंडमध्ये अनेक विक्रम केले आहेत. भारताचा सामना पाहात ही यशस्वी जोडी लॉर्डसच्या व्हीआयपी स्टँडमध्ये बसलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Ind Vs Eng 2nd ODI)

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली

सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर सुद्धा एका छायाचित्रात दिसत होती. सचिन-अंजली अनेक दिवसांपासून इंग्लंडमध्ये आहेत. सौरव गांगुलीचा वाढदिवस या सर्वांनी मिळून नुकताच साजरा केला. इतकेच नाही तर सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनीही लॉर्ड्सवर एकत्र दिसले. चेन्नई सुपर किंग्जचे दोन्ही स्टार्स बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसले. त्या दोघांचा फोटो सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला.

सुरेश रैनाबरोबर भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग सुद्धा स्टँडमध्ये दिसला. सुरेश रैना आणि हरभजन सिंग चेन्नई सुपर किंग्जसाठी दीर्घकाळ एकत्र क्रिकेट खेळले आहेत. (Ind Vs Eng 2nd ODI)

Raina Dhoni

लॉर्ड्सच्या या ऐतिहासिक मैदानावर भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू अनेक दिवसानंतर एकत्र आलेले पाहण्यास मिळाले. धोनी, रैना, सचिन, सौरव मैदानाबाहेर स्टँडमध्ये बसलेले दिसले. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीही मैदानात एकत्र खेळत होते. हा एक विलक्षण क्षण क्रिकेट रसिकांना पाहण्यास मिळाला. अनेकांना ९० च्या दशकांनंतरची आणि वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाची यावेळी आठवण झाली.

भारत आणि इंग्लंड दरम्यान दुसरी कसोटी आजपासून लॉर्ड्स मैदानावर रंगली. लॉर्ड्स मैदान हे क्रिकेटची पंढरी मानली जाते. लॉर्ड्स मैदानावर खेळणे क्रिकेटपटूंसाठी स्वप्न असते तर लॉर्ड्सवर क्रिकेट पाहायला मिळणं हे चाहते भाग्याचं मानले जाते.

या मैदानावर भारतीय संघाने अनेक ऐतिहासिक विजयांची नोंद केली आहे. १९८३ चा वर्ल्ड कप फायनल असो किंवा २००२ ची नॅटवेस्ट सीरीज फायनल असो, भारताने या मैदानावर इतिहास रचला आहे.

Back to top button