sushmita sen and lalit modi : सुष्मिता सेन आणि ललित मोदींनी थाटला संसार? ट्विटरवर फोटो व्हायरल

sushmita sen and lalit modi : सुष्मिता सेन आणि ललित मोदींनी थाटला संसार? ट्विटरवर फोटो व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेनसोबत लग्न केले आहे. दोघांचे लग्न मालदीवमध्ये झाल्याचे समजते आहे. अलीकडेच सुष्मिता सेन लग्नावर भाष्य करून चर्चेत आली होती. लग्न न करण्यावर तिने म्हटले होते की, मी तीन वेळा लग्न करण्याच्या खूप जवळ होते पण देवाने मला वाचवले. खरं तर, सुष्मिता तीन वेळा रिलेशनशिपमध्ये होती पण ते नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही. सुष्मिता सध्या 46 वर्षांची आहे.

सुष्मिताने रोहमनला अडीच वर्षे डेट केले

सुष्मिता सेन हिने रोहमन शॉलला अडीच वर्षे डेट केले. रोहमन आणि सुष्मिता यांच्या वयात 15 वर्षांचा फरक होता. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या नात्यादरम्यान, रोहमनचे सुष्मिताच्या दोन मुली रेनी आणि अलिशा यांच्याशीही चांगले संबंध निर्माण झाले होते. पण रोहमन आणि सुष्मिता या दोघांनी काडीमोड घेत एकमेकांशी फारकत घेतली.

रोहमन व्यतिरिक्त सुष्मिताचे होते सेलिब्रिटींसोबत अफेअर

विक्रम भट्ट : मिस युनिव्हर्स बनल्यानंतर सुष्मिताचे नाव सर्वप्रथम चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांच्याशी जोडले गेले. दस्तक (1996) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सुष्मिता आणि विक्रम जवळ आले होते. काही काळ रिलेशनशिपनंतर दोघांचे ब्रेकअप झाले.

रणदीप हुड्डा : रणदीप हुड्डा सुष्मितासोबतच्या अफेअरमुळे एकेकाळी चर्चेत होता. कर्मा, कन्फेशन आणि होली या चित्रपटात एकत्र काम करताना दोघे जवळ आले.

वसीम अक्रम : 2013 मध्ये सुष्मिताचे माजी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत अफेअर असल्याच्या बातम्याही चर्चेत होत्या. दोघेही लग्न करणार असल्याचे बोलले जात होते, मात्र सुष्मिताने हे वृत्त फेटाळून लावले.

हृतिक भसीन: 2015 च्या आसपास, सुष्मिता मुंबईतील रेस्टॉरंट मालक हृतिक भसीनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत आली होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते.

मुदस्सर अझीझ : दिग्दर्शक मुदस्सर अझीझ हे देखील अशा लोकांपैकी एक होते ज्यांचे सुष्मिताशी अफेअर होते. सुष्मिताने दिग्दर्शक म्हणून मुदस्सरचा पहिला चित्रपट 'दुल्हा मिल गया'मध्येही काम केले होते, जो फ्लॉप ठरला होता.

ललित मोदी 12 वर्षांपूर्वी देश सोडून पळून गेले

ललित मोदींनी आयपीएलची सुरुवात केली. ते 2005 ते 2010 पर्यंत बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. 2008 ते 2010 या काळात ते आयपीएलचे अध्यक्ष होते. 2010 मध्ये ललित मोदींना हेराफेरीच्या आरोपावरून आयपीएल अध्यक्ष पदावरून काढून टाकण्यात आले. याशिवाय त्यांना बीसीसीआयमधूनही निलंबित करण्यात आले. मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोप झाल्यानंतर ललित मोदी 2010 मध्ये देश सोडून पळून गेले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news