विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. ते गुवाहाटीला (आसाम) गेले. त्यांना एक एक करत शिवसेनेचे आमदार मिळाले. त्यामध्ये सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटीलहेही होते. गुवाहाटीला गेल्यानंतर बऱ्याच आमदारांनी आपले मोबाईल बंद करुन ठेवले होते. शहाजीबापू यांचाही मोबाईल बंद होता. या दरम्यान त्यांचे कार्यकर्ते त्यांना फोन करत होते; पण त्यांचा फोन बंद लागत होता. फोन लागताच त्यांचा कार्यकर्ता त्यांना विचारतो "नेते कुठाय, तेव्हा गुवाहाटीमधील वर्णन करताना म्हणतात. काय झाडी..काय डोंगार…काय हाटील ओक्केमध्ये सगळं… हा संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्याचे मिम्स, गाणी होवू लागली. या एका वाक्याने शहाजीबापूंची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड झाली.