ब्राझिलिया; वृत्तसंस्था : ब्राझील न्यायालयाने 10 वर्षांच्या बलात्कार पीडित मुलीच्या गर्भपाताला परवानगी नाकारली आहे. या प्रकरणाची सुनावणी करणार्या महिला न्यायाधीशाने पीडित मुलीला घरापासून लांब निवारागृहात पाठविले आहे.
न्यायालयाच्या या निर्णयानंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे. मानवाधिकार संघटनांनी न्यायालयाच्या निणर्याविरोधात निदर्शने सुरू केली आहेत. तसेच सोशल मीडियावर गर्भपातावरून वाद-विवाद सुरू झाले आहेत. वॉशिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, न्यायाधीश रिबेरो जिमर यांनी पीडित मुलीच्या गर्भपाताला नकार दिला आहे. तसेच पीडित मुलीने बाळाला जन्म देऊन त्याला ती दत्तक घेऊ शकते, असे सरकारी वकिलांनी म्हटले आहे. दरम्यान पीडित मुलीचा गर्भपात तिच्या घरात केला जाऊ शकत नाही. त्यामुळे तिला लांब निवारागृहात पाठविले आहे.पीडित मुलीवर घरातच बलात्कार झाला होता. मात्र आरोपीचे नाव उघड करण्यात आलेले नाही.