Crime News : धक्कादायक ! पैशाच्या हव्यासापोटी पत्नीनेच आवळला पतीचा गळा

श्रीरामपूर : बेलापूर-उक्कलगाव रोडवर एकलहरे शिवारात नईम रशीद पठाण या बॅटरी व्यवसायिक तरुणाचा दरोड्यात खून झाल्याचा बनाव करून त्याच्या पत्नीने त्याचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बुशरा नईम पठाण, वय 27 असे आरोपी पत्नीचे नाव आहे. बेलापूर येथील बॅटरी व्यवसायिक नईम रशीद पठाण यांच्या घरावर दरोडा टाकून दरोडेखोरांनी सात लाख रुपये लुटून नेतानाच नईम पठाण यांचा खून केला. नईम यांच्या पत्नीलाही जबर मारहाण करण्यात आली असून त्या गंभीर जखमी आहेत. दरोडेखोरांमध्ये एका महिलेचाही समावेश होता, अशा स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र दरोडेखोर आले याचा काही मागमुस पोलिसांना मिळाला नाही. शिवाय इतक्या रात्री बुशराने बंगल्याचा दरवाजा का उघडला? याचा संशय पोलिसांना आला.
संबंधित बातम्या :
- Crime news : दरोडेखोरांनी तरुणाची केली निर्घृण हत्या ; दरोड्यांत महिलेचाही समावेश
- Pune crime news : पत्नीनेच पतीकडून उकळली खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार
- Pune Crime News : आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री करणाऱ्या दलालास अटक
त्यांनी त्या दृष्टीने तपासाची चक्रे फिरवली. नाईन चा मृतदेह बेडवर होता. तेथे झटापट झाल्याची चिन्हे नव्हती. शिवाय त्याच्या पँटच्या खिशात चाळीस हजार रुपये होते. दरोडेखोरांनी सात लाख रुपये लुटून नेले. मग त्याच्या खिशातील चाळीस हजार रुपये का नेले नाही? असाही प्रश्न पडला. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. नातेवाईकांची चौकशी केली. नईम ची पत्नी बुशरा हीची तिची ननंद नसीम मुजफ्फर शेख यांच्या समक्ष चौकशी केली. त्यावेळी तिने दरोड्याचा बनाव करून आपणच खून केल्याची कबुली दिली.
हेही वाचा :