Nagar news : घुमरीचे वीज उपकेंद्र अखेर सुरू ; शेतकर्‍यांना होणार फायदा | पुढारी

Nagar news : घुमरीचे वीज उपकेंद्र अखेर सुरू ; शेतकर्‍यांना होणार फायदा

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  आमदार रोहित पवार यांनी उद्घाटन केल्यानंतरही घुमरी वीज उपकेंद्र कार्यान्वित झाले नव्हते. राष्ट्रवादीने कर्जत महावितरण कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करताच उपकेंद्राचा वीजपुरवठा महावितरण विभागाच्या अधिकार्‍यांनी सुरू केला. वीज केंद्र सुरू झाल्याने राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ काळदाते यांनी आंदोलन स्थगित केले. सुनील शेलार, नितीन धांडे, दीपक शिंदे, महेश जेवरे, रवींद्र सुपेकर, लाला शेळके, गणेश जंजिरे, यांच्यासह आंदोलक उपस्थित होते. विजेच्या विविध अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी महावितरणकडे वारंवार निवेदने देऊन मागण्या करूनही महावितरण शेतकरी व नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रवादी, मित्रपक्ष, शेतकरी व नागरिक एकत्र येत आमरण उपोषणाला बसले होते. अखेर उपोषणाची दखल घेत मागण्या मान्य केल्या.

दिघोळ, चौंडी आणि चिलवडी येथील नवीन वीज उपकेंद्र सुरू करावे. राशीन, मिरजगाव, भांबोरा, खांडवी आणि कुळधरण येथील उपकेंद्राची क्षमता वाढवावी. महावितरणमधील रिक्त पदे भरण्यात यावीत. आरडीएसएस योजनेतील कामे सुरू करावीत. शेतकर्‍यांकडून वीज बिलाची आकारणी करूनये. भारनियमन करण्यात येऊ नये. कोटेशन भरलेल्या शेतकर्‍यांना वीज जोड द्यावा, आदी मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले.

हेही वाचा :

 

Back to top button