Pune crime news : पत्नीनेच पतीकडून उकळली खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार | पुढारी

Pune crime news : पत्नीनेच पतीकडून उकळली खंडणी; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : खोट्या गुन्ह्यात अडकविण्या बरोबरच ठार मारण्याची धमकी देत पत्नीने पतीच्या बँक खात्यातून परस्पर 21 लाख 90 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर पतीला 29 लाख 26 हजार रुपयांचे कर्ज घेण्यास भाग पाडून खंडणी उकळली. याप्रकरणी, मर्चंट नेव्हीत नोकरीस असलेल्या 35 वर्षीय पतीने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पत्नी, तिचा मित्र, आई-वडील आणि भाऊ अशा पाच जणांच्या विरुद्ध फसवणूक, खंडणी, अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ऑक्टोबर 2022 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.

फिर्यादी आणि आरोपी पत्नीचे 2022 मध्ये लग्न झाले आहे. तेव्हापासून ते धानोरी परिसरात वास्तव्यास आहेत. पत्नीने ती घटस्फोटीत असून एक मूल असतानादेखील फिर्यादींना याबाबत माहिती दिली नाही. त्यांच्यापासून हे लपवून ठेवत पैसे मिळविण्याच्या हेतूने लग्न केले. त्यानंतर मित्र आणि इतरांसोबत संगनमत करून पत्नीने फिर्यादींना त्यांची महत्त्वाची कागदपत्रे जाळण्याची धमकी दिली.

एवढेच नाही तर खोट्या गुन्ह्यात अडकविण्याबरोबरच ठार मारण्याची धमकी देत फिर्यादींकडून वेळोवेळी व त्यांच्या बँक खात्यातून परस्पर 21 लाख 90 हजार रुपये आणि त्यांना कर्ज घेण्यास भाग पाडून 29 लाख 26 हजार रुपये आणि त्यांच्या मालकीच्या वस्तू ताब्यात घेतल्या. फिर्यादींना मानसिक व शारीरिक त्रास दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी याबाबत कोर्टात धाव घेतली होती. पुढील तपास विश्रांतवाडी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा

नगर जिल्ह्यातील 261 गावांची पैसेवारी कमी ; खरिपाची नजर अंदाज पैसेवारी जाहीर

मुंबई विद्यापीठात उद्या अमित शहा यांचे व्याख्यान

महिला आरक्षणाचं स्वागत, पण ओबीसींचे काय? : राहुल गांधी

Back to top button