अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी प्रशांत दरेकर

अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी प्रशांत दरेकर
Published on
Updated on

श्रीगोंदा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नागवडे साखर कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकरांची अहमदनगर जिल्हा काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र काँग्रेसचे नेते तथा माजीमंत्री बाळासाहेब थोरात व नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडेंच्या हस्ते देण्यात आले.

प्रशांत दरेकरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर महाविद्यालयीन जीवनात आंदोलने केली. त्यानंतर क्रांती युवक संघटनेची स्थापना करत हिरडगावसह श्रीगोंदा तालुक्यात तरुणांचे संघटन केले. हिरडगाव सोसायटीचे संचालक,श्रीगोंदा तालुका काँग्रेसचे अध्यक्षपद आता जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्षपदी निवड झाली आहे.

नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्याकडे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपद, अनुराधा नागवडे यांच्याकडे महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद, स्मितल वाबळे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. आता, प्रशांत दरेकरांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड लावून बाळासाहेब थोरातांनी नागवडेंसाठी उद्याच्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीसाठी मजबूत तटबंदी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पक्षवाढीसाठी प्रयत्नशील : दरेकर

नूतन कार्याध्यक्ष प्रशांत दरेकर म्हणाले, माजीमंत्री बाळासाहेब थोरात व राजेंद्र नागवडेंनी आपल्यावर विश्वास टाकून काँगेस पक्षाची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्यात पक्षवाढीसाठी आपण प्रयत्न करणार असून आहे. उद्याची लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँगेस पक्षाचा झेंडा फडकेल यासाठी आतापासून तयारी सुरू केली.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news