अहमदनगर : नऊ टपर्‍यांवर तंबाखूजन्य पदार्थ जप्त

file photo
file photo

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व गृह विभाग यांच्या वतीने संयुक्त कोटपा 2003 तंबाखू नियंत्रण कायदा उल्लंघन करणार्‍यांवर काल धाडसत्र मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 9 ठिकाणी छापे टाकून त्यांच्याकडून 4200 रुपयांचा आर्थिक दंड वसूल करण्यात आला. जिल्ह्यात शाळा व महाविद्यालये यांच्या परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री करणार्‍या एकूण 9 ठिकाणी धाड राबवून एकूण 4200 रुपये दंड करण्यात आला.

सदर मोहिमेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा सल्लागार डॉ.हर्षल पटारे, सामाजिक कार्यकर्ता दत्तात्रेय क्षरींरवश, मराठवाडा ग्रामीण विकास यंत्रणेचे अनिल गुंजे व तोफखाना पोलिस स्टेशनचे हवालदार जे. एन. आव्हाड, पोलिस नाईक योगेश चव्हाण आदी सहभागी झाले होते. याकामी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय घोगरे व पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news