राशीन : पोलिसांना खोटी माहिती देणार्‍याविरुद्ध गुन्हा | पुढारी

राशीन : पोलिसांना खोटी माहिती देणार्‍याविरुद्ध गुन्हा

राशीन(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत पोलिसांना खोटी माहिती देणार्‍या तालुक्यातील जलालपूर येथील दीपक भीमराव माने (वय 45) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांना 22 ऑगस्ट रोजी राशीन पोलिस दूरक्षेत्रात तत्काळ मदत पुरवणार्‍या डायल 112 करिता नेमण्यात आले होते. त्या वेळी त्यांना सकाळी 11.49 वाजता कॉल आला. कॉल करणार्‍या व्यक्तीस त्याच्या मुलाने मारहाण केली आहे, यात तो जखमी झाला आहे. मला तत्काळ पोलिस मदत हवी आहे अन्यथा मी आत्महत्या करतो, असे त्यावर सांगण्यात आले. मुरकुटे यांनी तत्काळ त्या क्रमांकावर कॉल केला. त्यास घटनास्थळ विचारले. त्याने जलालपूर (ता. कर्जत) सांगितले.

मुरकुटे यांनी तेथे जाऊन खात्री केली. त्या वेळी कॉल करणारा दीपक भीमराव माने दारूच्या नशेत आढळून आला. त्यास कोणीही मारहाण केली नव्हती. मुरकुटे यांनी त्यास फिर्याद द्यायची असेल, तर राशीन पोलिस दूरक्षेत्रात येऊन दे, असे सांगितले. त्याने पुन्हा डायल 112 ला दोनदा कॉल केला. पोलिस ठाण्याला खोटी माहिती दिल्याने मुरकुटे यांनी त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली.

हेही वाचा

पुणे : पिंपळाच्या झाडाची फांदी कोसळली थेट ग्राहकांच्या डोक्यावर

इंग्रजांना पळविले, तसे दोन्ही सरकारला पळवू : नाना पटोले

रशियाच्या खासगी लष्कर वॅगनर प्रमुखांचा विमान अपघातात मृत्यू

Back to top button