16 लाख रुपयांच्या, 23 टू व्हीलर हस्तगत , तोफखाना पोलिसांची कारवाई | पुढारी

16 लाख रुपयांच्या, 23 टू व्हीलर हस्तगत , तोफखाना पोलिसांची कारवाई

नगर : पुढारी वृत्तसेवा

शहरातील उपनगरातून दुचाक्यांची चोरी करणार्‍या सराईत चोरट्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. 15 लाख 90 हजार रूपये किंमतीच्या 23 दुचाकी पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केल्या आहेत. नगरच्या तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली. किसन उर्फ कृष्णा पोपट सापते (26, रा. खकाळवाडी ता.आष्टी जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. नगरमधून चोरलेल्या दुचाकींची विक्री तो बीड जिल्ह्यात करत होता.

सोलापूर : हॉटेल व्यवसायिकाच्या डोळ्यात चटणी टाकून अज्ञात चोरट्यांनी ३९ हजार रुपये लुटले

28 एप्रिल 2022 रोजी प्रोफेसर कॉलनी चौकातून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरुन नेल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली होती. दरम्यान आरोपीचा शोध घेत असताना पोलिस उप निरीक्षक समाधान सोळंके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून भिंगार परिसरात सापळा लावण्यात आला होता.

रत्नागिरी : हापूस आंबा प्रथमच समुद्रमार्गे अमेरिकेत

आरोपी किसन उर्फ कृष्णा पोपट सापते यांच्यावर संशय आल्याने तोफखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी विचारपुस केली असता त्याने विविध कंपनीच्या 23 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपी किसन सापते हा पूर्वी वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करत असल्याने त्याची बीड जिल्ह्यात ओळख होती.

सांगलीत पोलिसाला मारहाण

या ओळखीतून चोरीच्या सर्व दुचाकी त्याने जवळील नातेवाईकांना विकल्या होत्या. तसेच दुचाकी विकण्यासाठी तो खोटे कागदपत्रे तयार करत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे, पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

विटा पालिका ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेमध्ये राज्यात नववी

Back to top button