विटा पालिका ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेमध्ये राज्यात नववी | पुढारी

विटा पालिका ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेमध्ये राज्यात नववी

विटा : पुढारी वृत्तसेवा
माझी वसुंधरा अभियान 2.0 या राज्यस्तरीय स्पर्धेत विटा नगरपालिकेने नववा नंबर पटकावला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई येथे रविवारी होणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाचा ‘माझी वसुंधरा अभियान 2.0’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. ही स्पर्धा भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत नागरी स्थानिक संस्थांनी केलेल्या कामाचे मूल्यमापन करून त्यामधील सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या स्थानिक संस्थांचा सन्मान सोहळा रविवारी, 5 जूनरोजी सकाळी 10.30 वाजता होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील एकूण 226 नगरपालिकांनी सहभाग घेतला आहे.

Back to top button