सांगलीत पोलिसाला मारहाण | पुढारी

सांगलीत पोलिसाला मारहाण

सांगली : पुढारी वृत्तसेवा
येथील बसस्थानकात कर्तव्य बजावणार्‍या पोलिसाला विवेकानंद रमेश चौगुले (वय 26, रा. खटाव, ता. पलूस) याने शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिस शिपाई गणेश सायबांना कांबळे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

संशयित चौगुलेवर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले, पोलिस शिपाई गणेश कांबळे हे शहर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. ते दि. 3 रोजी रात्री बसस्थानक येथे कर्तव्य बजावत होते. रात्री संशयित विवेकानंद चौगुले हा तेथे आला. बसस्थानक परिसरात तो आरडाओरड करू लागला. कांबळे यांनी त्याला हटकले असता त्याने कांबळे यांना शिवीगाळ करुन मारहाण करू लागला. शहर पोलिसांना याची माहिती समजल्यानंतर त्यांनी धाव घेतली. संशयित चौगुलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

Back to top button