Khalistani : कंगना राणावतने मुंबई पोलिसांकडे मागितली वेळ | पुढारी

Khalistani : कंगना राणावतने मुंबई पोलिसांकडे मागितली वेळ

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर शेतकरी आंदोलनाची तुलना खलिस्तान्यांशी (Khalistani) करणारी अभिनेत्री कंगना राणावत आज मुंबई पोलिसांसमोर हजर राहणार नाही. मुंबईमध्ये नसल्यामुळे तिने मुंबई पोलिसांकडे थोडा वेळ मागितला आहे.

कंगनाला बुधवारी (२२ डिसेंबर) खार पोलीस ठाण्यात साक्ष नोंदविण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. तिच्‍या वकिलांनी पोलिसांना सांगितले की, “कंगना (Khalistani) बुधवारी पोलीस ठाण्यात हजर राहू शकत नाही. शुटि॑गनिमित्त ती सध्या मुंबईच्‍या बाहेर आहे.” याबाबत पोलिसांची कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.

 

शीख समुदायातील सदस्याने केली होती केस 

शेतकरी आंदाेलनाबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्‍याने शीख समुदायातील सदस्‍यांनी कंगनाविराेधात तक्रार दिली हाेती. याप्रकरणी २३ नोव्हेंबरला कंगनाविरोधात मुंबईच्या खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्‍यात आला हाेता.

कृषी कायद्यांविरोधात आंदोलनात सहभागी झालेल्‍या आंदोलकांना कंगनाने सोशल मीडियावरून ‘खलिस्तानी दहशतवादी’, असल्याचे सांगितले होते. जेव्हा केंद्राने संसदेतून कृषी कायदे मागे घेत होते, तेव्हा कंगनाचे हे वक्तव्य समोर आले होते.

आपल्या इन्स्टाग्रामवरून कंगनाने लिहिले होते की, “खलिस्तानी दहशतवादी आज भलेही सरकारला विरोध करत असतील. पण, आम्हाला त्या स्त्रीलादेखील विसरायला नको जिने आपल्या पायाखाली चिरडून टाकले होते. यांना डासांसारखं आपल्या पायाखाली चिरडून टाकलं होतं. पण, देशाचे तुकडे होण्यापासून वाचवलं होतं.”

पाहा व्हिडीओ : अखेर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या वानरांना केले जेरबंद…

Back to top button