Maratha Reservation update : सलाईनमधून मला विष देण्याचा डाव : जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप | पुढारी

Maratha Reservation update : सलाईनमधून मला विष देण्याचा डाव : जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : “सलाईनमधून मला विष देण्याचा डाव आहे”, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी आज (दि.२५) केला. मराठा अंतरवाली सराटी येथे समन्वयकांसोबत सुरु असलेल्या बैठकीमध्ये ते बाेलत हाेते.(Maratha Reservation update)

Maratha Reservation update : मी आज टोकाचा निर्णय घेणार…

माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “मी सामान्य माणूस आहे, सर्वसामान्य घरातून आलो आहे. मी कोणत्याच पक्षाचा नाही, मी फक्त मराठा समाजाचा आहे. मी कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही. समाजान मला अर्ध्यावर सोडलं तरी चालेल मी मात्र समाजाशी एकनिष्ठ राहील. माझी समाजावरील निष्ठा कमी होणार नाही.”

Maratha Reservation update : फडणवीस खेळ खेळत आहेत…

” मराठा आणि कुणबी एकच सिद्ध झाल आहे. आरक्षण पाहिजे तसं न देणं ही फडणवीसांच डोक आहे. मराठा समाजाविरोधात ते खेळ खेळत आहेत. लाठीचार्जनंतर माफी  मागायला लागल्याचा राग त्यांना आहे. त्याच रागातून देवेंद्र फडणवीस खेळी खेळत आहेत.  आणि  या खेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांचीही माणसं आहेत. फडणवीसांना माझा बळी हवा आहे. बैठक झाल्यावर मी सागर बंगल्यावर येतो मला मला मारुन दाखवा. असं आव्‍हानही त्यांनी देवेंद्र फडणवीसांना दिले.

मला बदनाम करण्याचा, संपवायचा कट

मला बदनाम करण्याच कटकारस्थान आणि मला संपवायच, असा डाव आहे. त्‍यांच ऐकणार नाही, फडणवीसांच ऐकलं नाही तर ते माणसं संपवतात, इतरांनी पुढे गेलेेले फडणवीसांना आवडत नाही,असे गंभीर आरोप जरांगे-पाटील यांनी केले. “खडसे कधी भाजप सोडू शकत नव्हते. मात्र फडणवीसांमुळे त्यांना पक्ष सोडावा लागला, भाजपला मोठे करणाऱ्या खडसेंची काय स्थिती आहे?, एकनाथ शिंदे यांनाही धाक दाखवून शिवसेना सोडायला लावली, महादेव जानकर धनगर नेता म्हणून डावललं, अजित पवार कधीच राष्ट्रवादी सोडू शकत नव्हते, सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात कटूता निर्माण केली. फडणवीसांच्या पाठबळामुळेच नारायण राणे माझ्या विरोधात बोलत आहेत, असेही गंभीर आरोप जरांगे-पाटील यांनी फडणवीसांवर केले.

हेही वाचा 

Back to top button