ठाणे : रास्तारोको करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात | पुढारी

ठाणे : रास्तारोको करणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे पोलिसांनी कॅटबरी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले. बारावीची परीक्षा असल्याने ठाण्यात प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र रास्ता रोको आंदोलन करण्यास अटकाव करीत आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्य सरकारने १० टक्के मराठा आरक्षण दिले मात्र कुणबी प्रमाणपत्र देताना सगेसोयरे या शब्दाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यांच्या आदेशावरून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ठाणे येथेही मराठा आंदोलक रास्ता रोको करणार होते. तत्पुर्वीच दत्ता चव्हाण, डॉ. पांडुरंग भोसले, दिनेश पवार, निखिल जाधव, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हेही वाचा : 

Back to top button