ST workers strike : पुणे विभागातील १४८ कर्मचारी निलंबित | पुढारी

ST workers strike : पुणे विभागातील १४८ कर्मचारी निलंबित

पुणे : पुढारी वृत्तसेवा

एसटीच्या पुणे विभागातील 13 डेपोंमधील 148 कर्मचाऱ्यांचे (148 ST employees suspended ) गुरूवारी रात्री उशिरा निलंबन करण्यात आले. यामध्ये स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे स्टेशन, पिंपरीतील वल्लभनगर, राजगुरूनगर, नारायणगाव, भोर, शिरूर, इंदापूर, बारामती, बारामती एमआयडीसी, सासवड, दौंड या एसटी डेपोतील कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दरम्यान, यासोबतच गुरूवारीच‌ राज्यातील 1 हजार 135 एसटी कर्मचारी निलंबित केले आहेत. यात सर्वाधिक पुणे विभागातील 148 कर्मचारी निलंबीत करण्यात आले आहेत (148 ST employees suspended)

आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचार्‍यांनी गेल्या तीन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. (148 employees suspended) त्यामुळे शासनाने हे आंदोलन दडपण्यासाठी हालचाली सुरू केल्यात.

Koo App

ऐन दिवाळीत २ हजार #ST कर्मचा-यांना निलंबित करून त्यांच्या चुली बंद करण्याचं पाप सरकारनं केलंय..

नोकरी घालवणं..
उपाशी मारणं..
बेघर करणं..
आत्महत्येस प्रवृत्त करणं..

हाच का #MVA चा कॅामन मिनिमम प्रोग्राम?

हे सरकारच कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीय

#निलंबन_सरकार चा धिक्कार असो!

Chitra Kishor Wagh (@ChitraKishorWaghCRKB) 12 Nov 2021

त्याचाच भाग म्हणून गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात एसटीचे कर्मचारी निलंबित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर बुधवारपासून राज्यातील एसटी स्थानकामधून खासगी बस वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

29 विभागानुसार गुरूवारी निलंबित करण्यात आलेले कर्मचारी :

  • पुणे – 148
  • औरंगाबाद – 15
  • जालना – 13
  • बीड – 67
  • लातूर – 5
  • उस्मानाबाद – 22
  • परभणी – 5
  • मुंबई – 64
  • पालघर – 57
  • रायगड – 36
  • रत्नागिरी- 27
  • ठाणे – 73
  • भंडारा – 18
  • गडचिरोली – 34
  • नागपूर- 30
  • वर्धा – 02
  • कोल्हापूर -15
  • सांगली – 44
  • सातारा – 5
  • सोलापूर – 5
  • अहमदनगर – 20
  • धुळे – 54
  • जळगाव – 91
  • नाशिक – 54
  • अकोला -66
  • अमरावती – 50
  • बुलडाणा – 40
  • यवतमाळ -56
  • चंद्रपूर – 5

एकूण :- 1 हजार 135 कर्मचार्‍यांचे निलंबन

शासनाच्या आदेशाप्रमाणे राज्यभर काम बंद आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात येत आहे. पुणे विभागात सुद्धा 148 कर्मचार्‍यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे विभागातील 13 डेपोमधील आहेत.

– रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, एसटी पुणे विभाग

बारामती आगारातील १३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

बारामती : पुढारी वृत्तसेवा

गेल्या रविवारपासून संपात सहभागी झालेल्या बारामती व एमआयडीसी या दोन आगारांच्या १३ कर्मचाऱ्यांवर बारामतीत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बारामती आगारातील सात तर एमआयडीसी आगारातील ६ कर्मचाऱ्यांचा निलंबित झालेल्यांमध्ये समावेश आहे. यासंबंधीची माहिती आगार व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी दिली.

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण होण्यासह अन्य विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दिवसेंदिवस त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. कोणत्याही परिस्थितीत संप मागे न घेण्यावर एसटी कर्मचारी संघटना ठाम आहेत. तर सरकारकडूनही संप मिटविण्यासंबंधी सकारात्मक पावले उचलली जात नाहीत. परिणामी वातावरण अधिकच चिघळले आहे. त्यात आता आगाराने कडक पावले उचलत १३ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीच्या निर्णयाचा अहवाल चार आठवड्यात न्यायालयात सादर करावा लागणार आहे. तोपर्यंत आम्ही संपावर ठाम आहोत अशी माहिती संघटनांकडून देण्यात आली.ॉ

दरम्यान, बारामतीत एसटीच्या संपामुळे प्रवाशांची गैरसोय सुरुच आहे. खासगी वाहनांद्वारे प्रवाशी वाहतूकीला बस स्थानकातून प्रारंभ झाला. परंतु एसटीची त्यामुळे बरोबरी होवू शकत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. खासगी वाहने पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय हलत नाहीत. शिवाय पुढे रस्त्यात अनेक प्रवाशी कोंबून भरले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो आहे. शाळा सुरु झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचेही मोठे हाल होत आहेत.

हे ही वाचा :

 

Back to top button