Ashadhi Wari 2023 : पंढरीच्या वाटेवरील वारकऱ्यांना मिळणार 'हवामान' सेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : आषाढी वारीमध्ये वारकर्यांना विशेष हवामान सेवा पुरवण्यात येणार आहे. वारी मार्गातील हवामानाची निरीक्षणे, पुर्वानुमान आदी माहिती हवामान संशोधन आणि सेवा, पुणे आणि प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून संयुक्तपणे दिली जाणार आहे. (Ashadhi Wari 2023)
पंढरपूर आषाढी एकादशी पायी वारीमध्ये लाखो भाविक महाराष्ट्राच्या कानाकाेपर्यातून सहभागी हाेतात. यंदा तुकाराम महाराज पालखी १० जून रोजी देहू येथून तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी ११ जून रोजी आळंदी येथून प्रारंभ हाेईल. २८ जूनला आषाढी एकादशीला दोन्ही पालख्या पंढरपूर विठ्ठल मंदिरात पोहोचतील. भारतीय हवामान खात्याने या संपूर्ण कालावधीत विशेष हवामान सेवा उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे. ही हवामान सेवा “हवामान संशोधन आणि सेवा, पुणे” आणि “प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई” यांच्याकडून संयुक्तपणे दिली जाणार आहे.
Ashadhi Wari 2023 : वारकर्यांना उपलब्ध हाेईल खालील माहिती
- यात्रेचा मार्ग आणि हवामान निरीक्षणे
- सध्याचे ठिकाण व हवामान अंदाज
- सद्य हवामान माहिती
- हवामान अंदाज व इशारे
(तपशीलवार हवामान अद्यतनांसाठी कृपया www.imdpune.gov.in मध्ये Pune Weather ला भेट द्या. किंवा QR कोड स्कॅन करा.)
🌱पालखी२०२३, #आषाढीवारीसाठी IMD पुणे, संपूर्ण कालावधीसाठी रोज विशेष हवामान सेवा पुरवणार. यात मार्गातील सलग हवामानाची निरिक्षणे, पुर्वानुमान व इ. माहीती असेल.कृपया याचा लाभ घ्यावा
Spl Weather Services for #Ashadhi Yatra,Mah.@CMOMaharashtra@MahaDGIPR @ddsahyadrinews @ClimateImd pic.twitter.com/gidUHBR2lH— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 10, 2023
हेही वाचा
- Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेदरम्यान हलवा-पुरी सह ‘या’ खाद्यपदार्थांवर बंदी; ‘हे’ पदार्थ खाऊ शकता
- Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यात कलाकारांकडून जागर
- Ashadhi Wari 2023 : पालखी मार्गावर दुचाकी रुग्णवाहिकेसह आरोग्यदूत
- Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यांसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज
- Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; महापालिकेचे दवाखाने तीन दिवस मोफत