Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यात कलाकारांकडून जागर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पालखी सोहळ्यात आपल्या कलेतून प्रबोधन करण्यास कलाकार सज्ज असून, यंदा संत श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात कलेचा जागर करण्यास कलाकारही तयारीला लागले आहेत. कोणी नारदीय कीर्तन, तर कोणी एकपात्री प्रयोग, असे विविध कार्यक्रम सादर करणार असून, कलाकार आपल्या कलेने दिंडीप्रमुखांसह वारकर्यांचे मनोरंजनातून प्रबोधन करण्यास तयार आहेत. पुण्यात दोन्ही पालख्यांच्या मुक्कामादरम्यान सगळे कलाकार मोठ्या उत्साहाने कार्यक्रम सादर करणार आहेत. पालखीत सहभागी झालेल्या हजारो वारकर्यांना वैविध्यपूर्ण कलांचा आनंद घेता येणार आहे.
दरवर्षी पालखी सोहळ्यात मनोरंजनातून प्रबोधन करण्याचे काम कलाकार मंडळी करतात. यंदा कलाकार पथनाट्य, सांगीतिक मैफली, भजन-कीर्तनाचे कार्यक्रम, प्रवचन, एकपात्री प्रयोग, असे विविध कार्यक्रम सादर करतील. संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग सादर करण्याचा अनोखा ‘आनंदडोह : आनंदवारी’ उपक्रम अभिनेते योगेश सोमण यांनी हाती घेतला आहे.
महाराष्ट्रातील लोकधारा ग्रुपकडून सोमवारी (दि. 12) भावगीत, भक्तिगीतांचा कार्यक्रम सायंकाळी साडेसात वाजता शिवाजीनगर येथील श्री रोकडोबा देवस्थान येथे आयोजिला आहे, असे गायक नितीन मोरे यांनी सांगितले.
पालखी सोहळ्यानिमित्त आम्ही अखंड कीर्तनमाला आयोजित केली असून, मंगळवारी (दि. 13) सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेला लाल महाल येथे विविध कीर्तनकार नारदीय कीर्तन सादर करतील. त्यात श्रेयस बडवे, मंगलमूर्ती औरंगाबादकर, संगीता मावळे, वेदिका गोडबोले, रेशीम खेडकर, विकास दिग्रजकर, वासुदेव बुरसे आणि उद्धव जावडेकर हे कीर्तन सादर करणार आहेत.
– शाहीर हेमंत मावळे, अध्यक्ष, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी
हेही वाचा
विखे-शिंदे यांच्यातील गैरसमज दूर ; वाद संपला : महसूलमंत्री विखे पाटील यांचे स्पष्टीकरण
मराठमोळया अप्सरा सोनाली कुलकर्णीचं आता काय करावं!
Nashik Lasalgaon : कांदा ट्रकमध्ये भरण्यासाठी आता अत्याधुनिक मशीनरी