Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यांसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज | पुढारी

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यांसाठी महावितरणची यंत्रणा सज्ज

पुणे; पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माउली यांच्या पालखी सोहळ्यांसाठी महावितरणकडून पुणे परिमंडल अंतर्गत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामे करून यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच संबंधित विभागांच्या कार्यक्षेत्रात 24 तास कार्यरत राहणा-या 30 अभियंता व 135 कर्मचार्‍यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. यासह मागणीप्रमाणे तात्पुरती वीज जोडणी देखील तात्काळ उपलब्ध होणार आहे.

आषाढी यात्रेनिमित्त पुणे परिमंडल अंतर्गत भोसरी, पिंपरी, रास्ता पेठ, राजगुरुनगर व मुळशी विभागांच्या कार्यक्षेत्रात जगदगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली यांचा पालखी सोहळा रविवार (दि. 11) ते बुधवार (दि. 14) पर्यंत होणार आहे. या विभागांमध्ये विविध ठिकाणच्या पालखी मार्गांवर व मुक्कामाच्या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपात रोहित्रे व इतर साधनसामग्री तयार ठेवण्यात आली आहे. वीज सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे.

सोबतच सामाजिक बांधिलकी म्हणून महावितरणचे अभियंता व कर्मचार्‍यांकडून पिण्याचे पाणी, फळ, अल्पोपाहार आदींची सेवा देण्यात येणार आहे. वीजखांब, फिडर पिलर, डीपी बॉक्स किंवा अन्य ठिकाणच्या वीजयंत्रणेपासून सुरक्षित अंतर ठेवावे. पालखी सोहळा मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी पुणे परिमंडल अंतर्गत अभियंता व कर्मचा-यार्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते 24 बाय 7 वीज सेवा देणार आहेत.

हेही वाचा

औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याचे प्रकरण ; शेवगावात दोन युवकांना अटक

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; महापालिकेचे दवाखाने तीन दिवस मोफत

बालिंगा दरोडा : एक संशयित ताब्यात; मोठ्या रॅकेटची शक्यता, तपासाची सूत्रे गतिमान

Back to top button