Amarnath Yatra 2023 : अमरनाथ यात्रेदरम्यान हलवा-पुरी सह 'या' खाद्यपदार्थांवर बंदी; 'हे' पदार्थ खाऊ शकता

पुढारी ऑनलाइन डेस्क : Amarnath Yatra 2023 : यावर्षी अमरनाथ यात्रा 1 जुलैपासून सुरू होत आहे. यात्रेदरम्यान लोकांचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी खाद्यपदार्थांची सुची तयार करण्यात आली आहे. यावेळी काही खाद्यपदार्थ प्रतिबंधित करण्यात आले आहे. तर यात्रेकरूंना कोणते भोजन मिळावे याविषयी यादी तयार करण्यात आली आहे. अमरनाथ श्राईन बोर्डाकडून जारी केलेल्या हेल्थ एडवाइजरीने यात्रेकरूंच्या आरोग्यावर प्रभाव टाकू शकतात असे भोजन प्रतिबंधित केले आहे.
Amarnath Yatra 2023 : काय खाऊ शकत नाही
अमरनाथ यात्रेदरम्यान कोणते पदार्थ मिळणार नाही याची श्राइन बोर्डाने एडवायजरी जारी केली आहे. त्यानुसार यात्रेकरूंना फास्टफूड, हलवा-पुरी, छोले भटुरे, जिलबी, डोसा यासारखे भोजन मिळणार नाही. लंगर संस्था, फूड स्टॉल आणि दुकानांसाठी मेनूची एक विस्तृत यादी दिली आहे. त्या यादीतील भोजनच यात्रेकरू खाऊ शकतात. याशिवाय यात्रेदरम्यान अल्कोहोल, तंबाखू, गुटका, पान मसाला, स्मोकिंग इत्यादी देखील बॅन करण्यात आले आहे.
Amarnath Yatra 2023 : काय खायला मिळणार
यावेळी प्रवासात हर्बल टी, लो फॅट दूध, लिंबूपाणी, भाज्यांचे सूप घेता येईल. फ्राईड राइस बंदी आहे. परंतु लोक सामान्य शिजवलेले भात खाऊ शकतात. याशिवाय तळलेले हरभरे, पोहे, उत्तपम, इडली, डाळ-रोटी असे हलके पदार्थ खाऊ शकतात. चॉकलेट, खीर, ड्रायफ्रुट्स, मध यांचेही सेवन करता येते.
यात्रेदरम्यान 14 किलोमीटर लांब मार्गावर चालताना यात्री पूर्णपणे ऊर्जावान राहावे. त्यांचे स्वास्थ उत्तम राहावे. यासाठी हे बदल करण्यात आले आहे.
दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक सुविधांवर जोर
सरकारने या वर्षी यात्रेकरू भाविकांना हेल्थ सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय यात्रेदरम्यान ऑक्सिजन बूथसह ठिकठिकाणी रुग्णालयाच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी नैसर्गिक दुर्घटनांमुळे ४२ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अधिक उपाययोजना यावेळी करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा :
Amarnath cloudburst : ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा स्थगित, मृतांचा आकडा १६ वर, ४० अद्याप बेपत्ता