अखेर मविआचे ठरलं : नाशिकमध्‍ये शुभांगी पाटील यांना पाठिबा | पुढारी

अखेर मविआचे ठरलं : नाशिकमध्‍ये शुभांगी पाटील यांना पाठिबा

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नाशिक पदवीधर मतदारसंघामध्‍ये शुभांगी पाटील यांना पाठिंबा देणार असल्‍याचे आज(  दि. १९) महाविकास आघाडीने जाहीर केले. यावेळी सत्‍यजीत तांबे त्‍यांच्‍यावर आजच निलंबनाची कारवाई करण्‍यात येईल, असेही संयुक्‍त पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले यांनी जाहीर केले.

यावेळी राष्‍ट्रवादी जितेंद्र आव्‍हाड, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे आणि काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष नाना पटोले उपस्‍थित होते. यावेळी नाना पटोले म्‍हणाले की, नाशिकमध्‍ये मविआ शुभांगी पाटील यांना पाठिंबा देईल. तर नागपूरमध्‍ये सुधाकर आडबोले, अमरावती मधून धीरज लींगाडे, औरंगाबाद मधून विक्रम काळे  आणि कोकणमधून बाळाराम पाटील हे मविआचे उमेदवार असतील. 

हेही वाचा

Back to top button