घरावर हल्ला करून वृद्धेसह तिघांना बेदम मारहाण | पुढारी

घरावर हल्ला करून वृद्धेसह तिघांना बेदम मारहाण

कर्जत : पुढारी वृत्तसेवा

बचत गटाचे पैसे घेतले, तर परत करण्याची दानत नाही, असे म्हटल्याच्या कारणावरून घरावर हल्ला करून एका वृद्ध महिलेसह तिघाजणांना बेदम मारहाण करण्यात आली, तसेच सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना तालुक्यातील रजपूतवाडी येथे घडली. हल्लेखोरांमध्ये जामखेड तालुक्यातील नान्नज येथील काही जणांचा समावेश आहे.

ज्ञानवापी प्रकरण : आज वाराणसी न्यायालयात आज सुनावणी

दरम्यान, ज्या जीपमधून आरोपी आले होते, ती बोलेरो जीप (क्रमांक एम. एच- 23एन 5419) ही कर्जत पोलिसांनी जप्त केली.
याप्रकरणी शुभम सुरेश सिंग परदेशी (राहणार रजपूतवाडी, ता. कर्जत) यांनी कर्जत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, आमचा चैतन्य फायनान्स नावाचा बचत गट आहे.

संभाजीराजेंना आमचा विरोध नाही, मात्र शिवसेना अपक्षाला पाठिंबा देणार नाही : संजय राऊत

याचे सभासद फिर्यादीचे चुलत भाऊ झुंबरसिंग असून, बचत गटाचे काम त्याची चुलत बहीण अश्विनी परदेशी या पाहत आहेत. यावेळी फोनवरून वैभव परदेशी यांच्यासोबत बचत गटाचे पैसे परत देण्यावरून बाचाबाची झाली. त्यानंतर वैभव व त्याची आई सारिका व पडूसिंग परदेशी यांनी शिवीगाळ केली व तुम्हाला दाखवतो, असे म्हणून निघून गेले.

खोल समुद्रातील पाण्याचे वाढते आहे तापमान

यानंतर त्या दिवशी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक पांढर्‍या रंगाची बोलेरो जीप (क्रमांक एम. एच. 23-एन 5419) ही एक निळ्या कंपनीची रिच कंपनीची कार (क्रमांक एम. एच. 42, एच 7687) या वाहनामधून वैभव परदेशी याचे नातेवाईक सोमनाथ परदेशी दशरथ परदेशी बंडूसिंग परदेशी श्रीगोंदा तालुक्यातील सादलगाव आणि जामखेड तालुक्यातील नान्नज येथील योगेश परदेशी व इतर अनोळखी दहा ते बारा जण वाहनामधून खाली उतरले आणि त्यांनी आमच्या घरावर जोरदार दगडफेक केली.

राशिभविष्य

यामधील एक दगड अजय परदेशी याच्या डाव्या हातावर मारून जखमी केले. यानंतर या जमावाने सुरेशसिंग परदेशी यांना डोक्यावर काठी मारून जखमी केले. त्यानंतर दहा ते बारा जणांनी फिर्यादी शुभम परदेशी यास जबर मारहाण केली, तसेच शुभमची आई सुनीता परदेशी यांना देखील बेदम मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हल्लेखोरांनी पळविले व जीवे मारण्याची धमकी दिली.

Heavy rainfall in Delhi : मुसळधार पावसाने दिल्लीला पुन्हा झोडपले

या हल्ल्यामध्ये फिर्यादी शुभम त्याचे वडील सुरेश सिंग, आई सुनीता व भाऊ अजय हे चौघे जण जखमी झाले आहेत. यानंतर आरडाओरड झाल्यामुळे वाडीतील आजूबाजूंचे सर्व लोक धावत आले. त्यानंतर हल्लेखोर त्या ठिकाणाहून त्यांची बोलेरो गाडी त्या ठिकाणी सोडून पळून गेले. याप्रकरणी कर्जत पोलिसांनी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारणाचा अधिक तपास कर्जत पोलिस करीत आहेत.

Back to top button