खोल समुद्रातील पाण्याचे वाढते आहे तापमान | पुढारी

खोल समुद्रातील पाण्याचे वाढते आहे तापमान

न्यूयॉर्क : जलवायू परिवर्तनाचा परिणाम सध्या प्रत्येक घटकावर होताना दिसत आहे. यातून अथांग महासागराचा खोल भागही सुटेनासा झाला आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’मुळे समुद्रातील खोल पाण्याचेही तापमान वाढत असल्याने भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ‘एक्सेटर युनिव्हर्सिटी’ आणि ब्रेस्ट युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. या संशोधनावेळी शास्त्रज्ञांनी समुद्रात 700 मीटरहून अधिक खोलीवर असलेल्या पाण्यासंबंधीची माहिती गोळा केली.

या संशोधनाच्या आधारे शास्त्रज्ञांनी अंदाज व्यक्‍त केला की, पुढील 50 वर्षांमध्ये समुद्राच्या खोलवरील पाण्याच्या तापमानात 0.2 अंश सेल्सिअसने वाढ होईल. शास्त्रज्ञांच्या मते, उत्तर अटलांटिकच्या उष्णकटिबंधीय भागात मोठ्या प्रमाणात अतिरिक्‍त उष्णता साठली आहे. या भागाने मानवनिर्मित असलेली अतिरिक्‍त 90 टक्के उष्णता शोषून घेतली आहे. या भागातील पाण्याच्या तापमानात 62 टक्यांनी वाढ झाली आहे.

समुद्राच्या पाण्याच्या तापमानात वाढ झाल्याने अनेक समस्यांना भविष्यात सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. याचा प्रमुख परिणाम म्हणजे समुद्राची पाणीपातळी वाढेल. यामुळे किनार्‍यावर वसलेल्या असंख्य शहरांना धोका निर्माण होणार आहे. दरम्यान, समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्याने समुद्राच्या पारिस्थितीकी तंत्रात बदल, प्रवाह आणि रासायनिक बदलांबरोबरच डिऑक्सिजीनेशनचाही धोका संभवतो. या सर्वांचा परिणाम पृथ्वीवरील समस्त जैवसृष्टीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button