अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षांचा कारावास | पुढारी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षांचा कारावास

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा
सन 2018 मध्ये जेजुरीतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी पवन ऊर्फ प्रणव नरसिंह कुडाळकर (वय 20, रा. जेजुरी) यास पुणे शिवाजीनगर न्यायालयाने 20 वर्षे कारावास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
ही माहिती जेजुरी पोलिसांनी दिली. जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सन 2018 मध्ये जेजुरी येथील एका अल्पवयीन मुलीवर पवन याने अत्याचार केला होता. त्याच्यावर जेजुरी पोलिसांनी भादंवी  कलम 376 आय व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव तसेच जेजुरीचे पोलिस उपनिरीक्षक कैलास गोतपागार यांनी केला होता. शिवाजीनगर पुणे न्यायालयात न्यायाधीश श्रीमती एस. व्ही. पोंक्षे यांनी याप्रकरणी आरोपीस भादंवी 376 खाली 20 वर्षे शिक्षा, 50 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास आणखी दोन वर्षे शिक्षा, तसेच पोक्सोखाली 3 वर्षे शिक्षा  व 25 हजार रुपयांचा दंड तसेच दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली.
सरकारी वकील म्हणून श्रीमती अरुंधती रासकर यांनी  काम पाहिले.  जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर, न्यायालय पोलिस कर्मचारी एस. डी. भोसले यांनी तपासकामी सहकार्य केले.
हे ही वाचा : 

Back to top button