मार्व्हलचा हा अव्हेंजर पडला आहे भारतीय पदार्थांच्या प्रेमात, तुम्ही ओळखला का याला?

मार्व्हलचा हा अव्हेंजर पडला आहे भारतीय पदार्थांच्या प्रेमात, तुम्ही ओळखला का याला?
Published on
Updated on

भारतीय खाद्य संस्कृतीचा जगभरात बोलबाला आहे. भारतीय माणूस जगात जिथे जिथे जातो तिथे आपली खाद्य संस्कृती घेऊन गेला आहे. त्यामुळेच आज अनेक परदेशी भारतीय खाणं आवडीने टेस्ट करताना दिसतात. अनेक परदेशी क्रिकेटर, सेलिब्रिटी, राजकारणी भारतीय खाण्याची वारेमाप स्तुती करताना दिसतात. या यादीत आता आणखी एका अव्हेंजरचा समावेश होताना दिसतो आहे.

मार्व्हलच्या अव्हेंजर टीममधील हॉकआय म्हणजेच अभिनेता जेरेमी रेनर हा सध्या भारतीय खाद्य पदार्थांची स्तुती करताना दिसतो आहे. जेरेमीने नुकताच भारतीय खाद्यपदार्थांचा फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्याने 'भारतीय जेवण खूपच चांगलं आहे. वेगळी राज्यं तितक्याच वेगळ्या डिश' हे कॅप्शन त्याने आपल्या पोस्टला दिलं आहे.

जेरेमी सध्या राजस्थानमध्ये आहे. राजस्थानमधील अलवार येथील मुलांसोबत क्रिकेट खेळताना त्याने एक फोटोही पोस्ट केला होता. एका एनजीओसाठी बनत असलेल्या शॉर्ट फिल्मसाठी जेरेमी भारतात आला आहे या शॉर्टफिल्ममध्ये जेरेमी सोबत अनिल कपूरही दिसणार आहे . गेले सात दिवस या शूटिंगसाठी जेरेमीचा राजस्थानमध्ये मुक्काम आहे.

जेरेमीने यापूर्वीही दिल्ली तील हॉटेलमधील एका डेझर्टचा फोटो पोस्ट केला होता. यामध्ये अव्हेंजर थीमचे कप केक बनवले गेले होते. राजस्थानमधील कासरोली फोर्ट इथे जेरेमीचा मुक्काम आहे. फोर्टपासून शुटिंग लोकेशनवर जाण्यासाठी त्याला रोज हेलिकॉप्टरने प्रवास करावा लागतो. जेरेमी सध्या हॉकआयवर बेतलेल्या डिस्ने हॉटस्टारच्या सिरीजमध्ये दिसतो आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news