पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांना सर्वोच्च न्यायालयाने ३४ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात आज एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली. सिद्धू यांनी केलेल्या धक्काबुक्कीत वृद्धाचा मृत्यू झाला हाेता. दरम्यान, सिद्धू यांना पंजाब पोलिसांकडून काेणत्याही क्षणी अटक हाेण्याची शक्यता आहे.
२७ डिसेंबर १९८८ राेजी सिद्धू व त्यांचे मित्र रुपिंदर सिंग हे कारने पटियाला येथे जात हाेते. यावेळी त्यांनी गुरनाम सिंग ( वय ६५) यांना कारची धडक बसली. याचा जाब गुरनाम सिंग यांनी विचारला. यावरुन दाेघांमध्ये भांडण झाले. या वेळी सिद्धू यांनी गुरनाम सिंग यांना धक्काबुक्की केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. पटियाला पोलिसांनी सिद्धू आणि रुपिंदर सिंग यांच्याविरोधात हेतुपुरस्सर हत्येचा गुन्हा दाखल केला होता.
सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी १९९९ मध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर २००६ मध्ये हरियाणा उच्च न्यायालयाने सिद्धू यांना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्या वेळी सिद्धू भाजपचे खासदार होते. उच्च न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी उच्च न्यायालयाच्या निकालास सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. १६ मे २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने हत्येच्या गुन्ह्यातून सिद्धू यांची निर्दोष मुक्त केले; पण,गुरनाम सिंग यांना मारहाण करताना दुखापत करण्याच्या गुन्ह्यासाठी कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवले हाेते. एक हजार रुपयांचा दंड भरून सिद्धू यांना दाेषमुक्त केले हाेते. आता सर्वोच्च न्यायालयाने मे २०१८च्या अआदेशाचे पुनरावलाेकन करत सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
हेही वाचा :