गुणवत्तेच्या जोरावर पुणे विद्यापीठ झेप घेणार | पुढारी

गुणवत्तेच्या जोरावर पुणे विद्यापीठ झेप घेणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांच्याच सकारात्मक दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. परंतु विद्यापीठ केवळ गुणवत्तेच्या जोरावर यापुढील काळात मोठी झेप घेणार आहे,’ अशी माहिती मावळते कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. डॉ. करमळकर यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ आज (18 मे) संपत आहे.

रिक्त झालेल्या कुलगुरुपदाची अतिरिक्त जबाबदारी डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. करमळकर यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. ‘पाच वर्षांचा कार्यकाळ अत्यंत समाधानाचा होता.

VVS Laxman : व्हीव्हीएस लक्ष्मण होणार टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक

कुलगुरुपद स्वीकारताना ठरवलेल्या योजनांपैकी प्रशाला प्रणाली, शिक्षण आणि उद्योगाला जोडणे, संशोधनाला चालना अशा काही गोष्टी साध्य झाल्या, तर प्राध्यापकांची भरती करायची राहिली. प्राध्यापक म्हणून काम करतानाही कधी याच विद्यापीठाचा कुलगुरू होईन, असे वाटले नव्हते. पण गेल्या पाच वर्षांत वेगवेगळ्या स्तरांवर विद्यापीठासाठी योगदान देता आले,’ असेही त्यांनी सांगितले.

‘कुलगुरू म्हणून जबाबदारी घेतल्यावर काही गोष्टी करायच्या ठरवल्या होत्या. त्यानुसार नवी बांधकामे करण्यापेक्षा रखडलेली बांधकामे पूर्ण करण्याला प्राधान्य दिले. शिक्षणाला उद्योग क्षेत्राशी जोडण्यात यश आले. आयुका, सीडॅकसारख्या राष्ट्रीय संस्थांना सोबत घेऊन नव्या अभ्यासक्रमांची निर्मिती केली. संशोधन, नवउद्योजकांना चालना देण्यासाठी विद्यापीठाअंतर्गत दोन कंपन्यांची स्थापना केली. विद्यापीठाचे क्रमवारीतील स्थान काही प्रमाणात उंचावले. या सगळ्यांचा परिणाम येत्या काळात दिसून येईल,’ असे त्यांनी सांगितले.

सांगली : कुपवाडमध्ये आर्थिक वादातून ऑनलाईन लॉटरी चालकाचा खून 

डेक्कन संस्थेत संशोधनासाठी देणार वेळ
भूशास्त्रज्ञ असलेले डॉ. करमळकर यांना आता येत्या काळात त्यांच्या संशोधनाच्या क्षेत्रासाठी अधिक वेळ द्यायची इच्छा आहे. तसेच डेक्कन कॉलेजमध्ये ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कन्टेम्पररी इंडॉलॉजी’ची स्थापना करण्याचा प्रस्ताव त्यांनी तयार केला आहे. त्यासाठी काम करण्याचे त्यांचे नियोजन आहे.

हे ही वाचा : 

Rakhi Sawant : ६ वर्षांनी लहान आहे राखीचा नवा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी

बुलडोझर कारवाईसंबंधी अहवाल सादर करा : केजरीवाल सरकारचे तिन्ही महानगरपालिकांना आदेश

Jasprit Bumrah : बुमराहने रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करत बनला पहिला भारतीय गोलंदाज!

Back to top button