सांगली : कुपवाडमध्ये आर्थिक वादातून ऑनलाईन लॉटरी चालकाचा खून  | पुढारी

सांगली : कुपवाडमध्ये आर्थिक वादातून ऑनलाईन लॉटरी चालकाचा खून 

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : शहरातील बामणोली रस्त्यालगत असलेल्या एका ऑनलाईन लॉटरी चालकाचा आज (दि.१८) रोजी भरदुपारी आर्थिक वादातून चाकूने भोसकून खून करण्यात आला. प्रशांत महादेव नवाळे (वय ५५, रा.कापसे प्लॉट, कुपवाड) असे त्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयितास हत्यारासह ताब्यात घेतले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कुपवाड -बामणोली रस्त्यालगत कोकरे यांचे दोन दुकान गाळे आहेत. त्यापैकी एका दुकानात गेल्या दीड वर्षांपासून प्रशांत नवाळे हे भाड्याने गाळा घेऊन ऑनलाईन लॉटरी सेंटर चालवत होते. बुधवारी दुपारी नवाळे ऑनलाईन सेंटरमध्ये बसले होते. अचानक एका तरुणाने येऊन नवाळे याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. हल्ला होताच सेंटरमधील काही तरुणानी पलायन केले. यानंतर शेजारील देशी दारू दुकानासह रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील सर्व दुकानेही बंद करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवाळे याला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button