नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असले तरीही राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) पावसाळ्यानंतर म्हणजे ३ महिन्यांनीच घेणे शक्य आहे, असे मत राज्याचे मदत व पुनर्वसन आणि ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मंगळवारी दिल्ली येथे व्यक्त केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने काम सुरू केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) आणि मुख्य निवडणूक आयुक्तांनी सोमवारीच त्याविषयी बैठक घेतली. मात्र, केवळ दोन आठवड्यांच्या कालावधीत निवडणूक कार्यक्रम आयोगातर्फे जाहीर होण्याची शक्यता कमी आहे, मंत्री वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.
कारण, कार्यक्रम जाहीर करण्यापूर्वी मतदार याद्या, आरक्षण निश्चिती, वॉर्ड-प्रभाग निश्चिती, हरकती आदी प्रक्रिया पूर्ण करावी लागते आणि केवळ दोन आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही. त्याचप्रमाणे पावसाळ्यात निवडणूक घेणे शक्य नसल्याचे आयोगाचे मत आहे. त्यामुळे ३ महिन्यांनंतरच निवडणुका घेणे शक्य असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?