Detonators : नागपूर रेल्वे स्थानकावर जिवंत स्फोटकांची बॅग आढळल्याने खळबळ | पुढारी

Detonators : नागपूर रेल्वे स्थानकावर जिवंत स्फोटकांची बॅग आढळल्याने खळबळ

नागपूर : पुढारी वृत्तसेवा :  नागपूर येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद वस्तू असलेली बॅग सापडली. बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये ५४ डिटोनेटर्स  (Detonators) सापडले असल्याचे नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. सोमवारी रात्री नागपूर रेल्वे स्थानकावर स्फोटके भरूलेली ही बॅग सापडली होती. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलिसांनी याचा तपास सुरू केला असून,  प्राथमिक तपासात ही स्टोटके (Detonators) फार घातक नसल्याची माहिती अमितेशकुमार यांनी दिली. तपास अगदी प्राथमिक स्तरावर असल्याने फार माहिती देणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. एका काळ्या रंगांच्या बॅगमध्ये ५४ डिटोनेटर आढळून आली असली तरी, त्यांची क्षमता केवळ फटाक्यांएवढीच होती. त्या बॅगमध्ये जिलेटीन आढळून आले नसल्याचे देखील पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. स्फोटकांचा कोणत्याही दहशतवादी संघटना किंवा नक्षलवादी संघटनांसोबत संबंध आढळून आला नसल्याचेदेखील त्यांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकरणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि बीडीडीएस तपास करत आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे आरपीएफ अधिकारी आशुतोष पांडे यांनी दिली।

नागपूर शहरातील मुख्य रेल्वे स्थानक कंपाऊंड परिसरातून सुरक्षा पोलिसांनी ही बॅग जप्त जप्त केली आहे. बॅगमध्ये छोट्या आकाराच्या डिटोनेटर्स आढळून आले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. जप्त करण्यात आलेले डिटोनेटर्स खाण मध्ये ब्लास्ट करण्याच्या कामात येतात. बॅगमध्ये जिवंत स्फोटके असल्याचे निष्पन्न होताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. बीडीडीएस पथकाने स्फोटके भरलेली बॅग ताब्यात घेऊन ती सुरक्षित ठिकाणी हलवली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button