राजधानी दिल्लीला उष्णतेसंबंधी ‘यलो अलर्ट’ | पुढारी

राजधानी दिल्लीला उष्णतेसंबंधी 'यलो अलर्ट'

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा उन्हाचा पारा वाढण्यास सुरूवात झाली आहे. हवामान विभागाने बुधवारपासून पुढील पाच दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. गरम हवांसह भीषण उकाड्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. सोमवारी देखील दिल्लीचा पारा सामान्यपेक्षा अधिक नोंदवण्यात आला होता. एक दिवसापूर्वी तापमान सामान्यपेक्षा १ अंश सेल्सियसने अधिक ४० तसेच कमाल तापमान ३ अंश सेल्सियसने अधिक म्हणजेच २७.६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. दिल्लीतील नजफगड तसेच जफरपूर परिसरात ४१.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली.

पुढील २४ तासांपर्यंत हवामान स्वच्छ राहील तसेच कमाल तापमान ४१ अंश सेल्सियय तसेच किमान तापमान २८ अंश सेल्सियस नोंदवले जावू शकते. बुधवारपासून पारा वाढण्यास  सुरूवात होणार असून आठवडाभर भीषण उकाडा जाणवेल, असा इशारा हवामान खात्याने मंगळवारी दिला आहे. आठवडा अखेरपर्यंत दिल्लीतील कमाल तापमान ४४ अंश सेल्सियस पर्यंत पोहचण्याचा अंदाज विभागाने वर्तवला आहे.

बंगालच्या खाडीतील असानी चक्रवादळामुळे पूर्व दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यामध्ये आर्द्रतेची पातळी वाढली आहे. मार्च महिन्यात यंदा पाऊस झाला नाही. मार्च महिन्यात सरासरी १५.९ मिमी पाऊस होतो. तर, एप्रिल महिन्यात ०.३ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली होती. सामान्यत: या महिन्यात १२.२ मिमी पावसाची नोंद घेतली जाते.

हेही वाचलंत का ?

Back to top button