पुणे महापालिकेच्या ‘शहरी-गरीब‘ योजनेवर अखेर निर्बंध! | पुढारी

पुणे महापालिकेच्या ‘शहरी-गरीब‘ योजनेवर अखेर निर्बंध!

पुणे : पुढारी वृत्तसेवा

शहरी-गरीब योजनेतील गैरप्रकार टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून काही निर्बंध घालण्यात येणार आहेत. या योजनेचे अर्ज ठराविक कालावधीतच स्वीकारले जाणार आहेत.

मोठा दिलासा : कोरोनाची चौथी लाट येण्‍याची शक्‍यता नाही : वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ प्रो. मनींद्र अग्रवाल यांचा दावा

या संदर्भात प्रशासकीय पातळीवर नियोजन सुरू असून, त्याला अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरातील गरीब नागरिकांसाठी शहरी-गरीब योजना राबवण्यात येते. यासाठी उत्पन्नाची अट एक लाख रुपये आहे. पिवळे रेशन कार्ड आणि गवनि शुल्क भरणार्‍या नागरिकांनाही ही योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेसाठी कोट्यवधी रुपये महापालिका प्रशासनाकडून खर्च करण्यात येत आहेत.

राजकीय दंगलींमुळे भारताचा श्रीलंका होण्‍यास वेळ लागणार नाही : संजय राऊत

गंभीर आजारासाठी दोन लाख आणि इतर आजारांच्या उपचारासाठी एक लाख रुपये महापालिकेकडून देण्यात येतात. दिवसेंदिवस लाभार्थींच्या संख्येत वाढ होत आहे. मात्र, शहरातील गोरगरिबांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ राजकीय आशीर्वादाने धनदांडगेही घेत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे या योजनेवरील खर्च 50 कोटींच्या घरात पोहचला आहे. नगरसेवक आपल्या फायद्यासाठी केव्हाही योजनेचे कार्ड नागरिकांना विशेषतः धनदांडग्यांना मिळवून देतात. यासाठी प्रशासनावर दबाव टाकतात. या पार्श्वभूमीवर
प्रशासनाने मागील वर्षी योजनेतील लाभार्थ्यांची तपासणी करण्याचे ठरवले होते. त्यात बोगस आढळलेल्या लाभार्थींना नोटिसा पाठवल्या होत्या.

हेही वाचा

कचरा व्यवस्थापनासाठी पुणे मनपा 15 कोटी; संगणक प्रणाली करणार विकसित

कोल्हापूर : समुद्री उष्ण लहरी वाढल्या; मान्सूनवर प्रतिकूल परिणाम

आधी भाजपचे सरकार असलेल्या राज्यातील मशिदीवरील भोंगे उतरवा : प्रवीण तोगडीया यांचे आवाहन

Back to top button