पंढरपूर तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत | पुढारी

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा पावसाळ्यातील दिड महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी पंढरपूर तालूक्यातील ओढे, नाले कोरडे ठाक पडलेले आहेत. अद्यापही खरीप हंगामातील पेरण्या खोळांबलेल्या आहेत. आषाढी यात्रा कालावधीतील रिमझिप पावसाचे पाच दिवस वगळता पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अद्यापही शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसून येते.
पंढरपूर तालुका हा ऊस शेतीसाठी प्रसिध्द आहे. ताक्यातील भीमा, माण नदी काठ तसेच उजनी डावा व उजवा कालवा तसेच निरा उजवा कालवा परिसर ऊस शेतीने बहरला आहे. याच बरोबर ऊस शेतीला पर्यायी शेती म्हणून द्राक्षे, डाळिंब, बोर, सीताफळ आदी फळबागांचेही शेतकरी उत्पादन घेत आहेत. मात्र, सध्या पावसाने शेतकर्‍यांची निराशा केली असल्याने फळबागांचे बहार, ऊस बांधणी आदी कामे रखडली आहेत.

तर पेरणी लायक ओल जमिनीत नसल्याने शेतकरी मका, बाजरी, तूर, ज्वारी आदीची पेरणी करणे थांबवले आहे. मात्र, काही शेतकर्‍यांनी पाऊस पडेल, या आशेवर मका पिकाच्या पेरण्या केल्या आहेत. मात्र, तेही शेतकरी आता पाऊस लांबल्याने चिंताग्रस्त झालेले आहेत.
आषाढी यात्रा काळात सलग पाच दिवस रिमझिम पावसाने हजेरी लावली. मात्र, या पावसाने शेतीपिकांना फायदा होण्याऐवजी फळबागांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्यास मदतच झाली आहे. पाच दिवस पाऊस झाला. मात्र, या पावसाने पेरणीसाठी जमिनीत ओलदेखील तयार झाली नाही. अशी परिस्थिती तालुक्यातल बहुतांश गावात आहे. शेतकर्‍यांनी जमिनीच्या मशातगती करुन ठेवल्या आहेत. दमदार पाऊस झाला की पेरणी करावयाची म्हणून बि बियाने खरेदी करून ठेवलेले आहेत. मात्र, दमदार पाऊसच अद्याप झालेला नसल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

दमदार पाऊसच झाला नसल्यनो ग्रामीण भागातील ओढे, नाले कोरडे पडलेले आहेत. विहीरी कोरड्या ठाक आहेत. जोपर्यंत विहिरींना पाणी वाढत नाही, ओढे, नाल्यांना पावसाचे पाणी येत नाही. तोपर्यंत खरीपाची पेरणी करण्याचे धाडस शेतकरी करताना दिसत नाहीत. पेरणी खर्च, बियाने, खते याचा विचार करता शेतकरी सावधपणे पाऊल उचलताना दिसत आहेत. तर पाऊस लांबला की पेरणी हंगाम लांबत असल्याने याचीही चिंता शेतकर्‍यांना सतावत आहे. त्यामुळे पाऊस वेळेवर पडावा व दमदार पडावा, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

पेरण्या खोळांबल्या

दमदार पाऊस झाला नसल्याने विहीरी, ओढे, नाले कोरडे आहेत. पेरणी लायक ओल जमिनीत नसल्याने शेतकरी मका, बाजरी, तूर, ज्वारी आदीची पेरणी करणे थांबवले आहे.शेतकर्‍यांनी पेरण्या थांबवल्याने बि बियाने दुकानदारही चिंताग्रस्त झाले आहेत.

Back to top button