

पुढारी ऑनलाईन डेस्क :
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडी कमालीच्या वेगावल्या आहेत. आज दुपारी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश देताच शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सायंकाळी पाच वाजता सुनावणी होणार आहे. याकडे महाविकास आघाडी सरकारसह संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेत गुजरातमधील सूरत गाठले. यानंतर ते थेट बंडखोर आमदारांसह आसामची राजधानी गुवाहाटीत गेले. गेली ९ दिवस ते आसाममध्ये आहेत. राज्यपालांनी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिल्यानंतर एकनाथ शिंदे बंडखोर आमदरांसह आज गोव्यात दाखल होणार आहेत.
राज्यपालांच्या आदेशानंतर राजकीय घडामोडी कमालीच्या वेगावल्या आहेत. आज विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील रणनीती ठरवली जाण्याची शक्यता आहे. आज सायंकाळीच राज्यपालाच्या आदेशाविरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायलयात सुनावणीही होणार आहे. त्यामुळे भाजपच्या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाकडेही लक्ष असणार आहे.
हेही वाचा :