अरे बापरे..! कोकणातून पुण्यात पोहचला अजगर | पुढारी

अरे बापरे..! कोकणातून पुण्यात पोहचला अजगर

पिंपरी: पिंपळे गुरव येथील रहिवाशांच्या गाडीच्या बोनेटमधून चक्क कोकणातून प्रवास करीत पुण्यात एका अजगराचे पिल्लू आले. रहिवाशांनी ताबडतोब वर्ल्ड फॉर नेचरच्या वन्यजीवरक्षकांशी संपर्क साधला. वन्यजीवरक्षकांनी अजगराच्या पिलास सुखरूप बाहेर काढून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. रहिवांशानी गाडीच्या बोनेटमध्ये घोणस आहे,अशी माहिती वन्यजीव रक्षक दीपक शर्मा आणि शशी मोरे यांना दिली. घटनास्थळी पोहचताच त्यांना कळाले की, हा घोणस नसून अजगराचे पिल्लू आहे. वाहनचालक यांच्याकडे चौकशी केली असता टुरिस्ट गाडी असून ती कोकण परिसरातून आली आहे, असे कळाले. अजगराच्या पिलास वन्यजीव रक्षकांनी सुखरूप बाहेर काढून योग्य अधिवासात मुक्त करण्यात आले.

अजगर हा जंगलात आढळणारा प्राणी आहे. मात्र, मुसळधार पाऊस असेल किंवा मानवी वस्तीत माणसांपासून लपण्याकरिता बर्‍याचदा साप गाडीमध्ये लपून बसतात. अशाच कारणाने अजगराचे पिल्लू गाडीच्या बोनेटमधून लपून कोकण ते पुणे प्रवास करीत आले.
– शुभम पांडे, संस्थापक, वर्ल्ड फॉर नेचर

Back to top button