समृद्धी महामार्गावर अ‍ॅग्रो लॉजिस्टिक पार्क होणार

file photo
file photo

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य वखार महामंडळास मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर जांबर गाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथे सुमारे 50 एकर जागा मिळालेली आहे. त्याठिकाणी अ‍ॅग्रो लॉजिस्टिक पार्क संकल्पतंर्गत शेतकरी प्रशिक्षण केंद्र, ई-ट्रेडिंग प्लॅटफॉर्म, ब्लॉकचेनवर शेतमाल तारण कर्ज योजना, तसेच 10 हजार मे.टन क्षमतेचे सायलो गोदाम, सहा हजार मे.टन क्षमतेच्या गोदामांची बांधकामे, सामाईक सुविधा केंद्र, ट्रक टर्मिनल असा प्रकल्प राबविण्यात येत असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली.

वखार महामंडळाचा रविवारी (दि.8) 64 वा वर्धापन दिन असून त्यानिमित्ताने त्यांनी महामंडळाच्या कामाची माहिती दिली. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, पणन राज्यमंत्री शंभूराजे देसाई, सहकार सचिव अनुप कुमार यांचे मार्गदर्शन आणि नियोजनानुसार महामंडळ कार्यरत असल्याचे ते म्हणाले.

समृद्धी मार्गावरील 35 कोटी रुपयांच्या प्रकल्पापैकी राष्ट्रीय कृषी योजनेमार्फत 19.35 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झालेले असून सध्या गोदामांचे बांधकाम सुरू झाले आहे. उर्वरित प्रकल्पही लवकरच सुरू होतील. मंहाडळाचे वसूल भाग भांडवल 8.71 कोटी आहे. महामंडळ स्थापनेपासून सातत्याने नफ्यात आहे. राज्यात एकूण 205 ठिकाणी वखार केंद्रे असून, त्यांची साठवणूक क्षमता 21.40 लाख मे.टन आहे.

सर्व मालसाठ्याचा शंभर टक्के विमा…

महामंडळाच्या गोदामातील साठवणुकीसाठी ठेवलेल्या सर्व माल साठ्याचा शंभर टक्के विमा उतरविण्यात येतो व सद्यस्थितीत 5 हजार 100 कोटींची विमा पॉलिसी आहे. शेतकर्यांनी सातबारा उतारा सादर केल्यानंतर अशा शेतमालाच्या साठवणूक आकारात पन्नास टक्क्यांइतकी घसघशीत सूट दिली जात आहे. पूर्वी बांधलेल्या जुन्या गोदामांची सुधारणा, दुरुस्ती आणि नूतनीकरण करण्याचे नियोजन आहे. सांगोला व तासगाव येथे अनुक्रमे 840 मे.टन व 856 मे.टन क्षमतेचे शीतगृह उभारणीचे काम सुरू आहे.

108 कोटींचा नफा अपेक्षित

महामंडळास आर्थिक वर्ष 2020-21 अखेर सुमारे 108 कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे. तर चालूवर्ष 2021-22 मध्ये जागतिक बँक प्रकल्प आणि राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत राज्यात विविध कामे सुरु आहेत. त्याअन्वये वीस ठिकाणी 28 गोदांमाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचे तावरे यांनी सांगितले.

हे ही वाचलं का? 

https://youtu.be/r-lG9gBXOsA

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news