मुंबई, पुढारी वृत्तसेवा: 'हॅलो, मी शरद पवार बोलतोय' असा फोन एका मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला आला आणि तो अधिकारही हडबडला. हा शरद पवार यांचा आवाज हुबेहूब होता.
फोनवर चक्क शरद पवार बोलत होते आणि आवाजही हुबेहूब होता. शिवाय तो कॉल बदलीसाठी होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पडताळणी केली.
त्यानंतर हा फोन बनावट असल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी तिघांना अटक केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा वापर करुन त्यांचा आवाज काढत बुधवारी मंत्रालयात फोन केला.
याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक याचा तपास करत आहे.
याप्रकरणी पुण्यातील येऊर परिसरातून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नुकत्याच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याला बुधवारी एक फोन आला.
त्या व्यक्तीने शरद पवार यांच्या नावाचा वापर करुन त्यांचा आवाज काढत या अधिकाऱ्याशी बोलणे केले.
खुद्द शरद पवार यांचा फोन आल्याने हा अधिकारी हडबडला होता.
अधिकाऱ्यानेअधिक विचारपूस केल्यानंतर कॉल करणाऱ्याने शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरून फोन केला आहे,अशी माहिती दिली.
शरद पवार यांचा हुबेहूब आवाज होता. मात्र असा फाेन कधीच येत नाही, त्यामुळे अधिकाऱ्याचा संशय बळावला.
मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात शोध घेत थेट सिल्व्हर ओकपर्यंत पडताळणीसाठी कॉल करण्याची वेळ आली.
तपासणीमध्ये हा कॉल फेक असल्याचे उघड झाले. मात्र शरद पवार यांचा आवाज काढत या व्यक्तीने कॉल केल्याने मंत्रालयात एकच खळबळ उडाली.
अखेर रात्री उशिरा याप्रकरणी गावदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढे हा तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला देण्यात आला आहे.
हेही वाचलं का?