गजानन काळे यांचे अनेक महिलांशी संबंध; पत्नीकडून अनेक गंभीर आरोप - पुढारी

गजानन काळे यांचे अनेक महिलांशी संबंध; पत्नीकडून अनेक गंभीर आरोप

नवी मुंबई; पुढारी वृतसेवा : गजानन काळे : नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीकडून नेरूळ पोलीस ठाण्यात मानसिक,  शारिरीक छळवणूक करणे आणि जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षापासून गजानन काळे आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने केला आहे.

गजानन काळे हे पत्नी आणि एक मुलगा यांच्यासोबत नेरूळ येथे राहत होते. ते रियल इस्टेट आणि महापालिकेत सब कॉन्ट्रॅक्टर होते. मैत्रीतून प्रेम आणि मग आंतरजातीय विवाह काळे यांनी केला.  मात्र लग्नाला 15 दिवस पुर्ण झाल्यानंतर नवरा बायकोत घरगुती वादातून पहिली ठिणगी पडली होती. मात्र हा वाद अधूनमधून असाचा सुरू होता.

जाचाला कंटाळून गुन्हा दाखल

अखेर काळे यांच्या पत्नीने या जाचाला कंटाळून पोलीस ठाण्यात मानसिक आणि शारिरीक छळवणूक करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी पोलीसांना दिलेल्या माहितीत त्यांच्या पत्नीने गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.

त्यामध्ये गजानन काळे यांचे बाहेरील महिलांशी संबंध असल्याने आपल्यावर घरात अन्याय करीत असल्याचा पत्नीने एफआयआरमध्ये नमूद केले आहे.

काळे यांचे परस्त्रीयांसोबत अनैतिक संबंध असल्याचे अनेक वेळा माझ्या निदर्शनास आले आहे.  त्याला येणारे फोन कॉल, मेसेजवरुन ते लक्षात येते. मी त्याला वारंवार समजून सांगायचे, पण माझ्या काही पत्रकार मैत्रिणी आहेत.

तू याच्यात लक्ष घालू नको, असं म्हणून तो मला मारहाण करायचा, असंही गजानन काळे यांच्या पत्नीने पोलिस तक्रारीत म्हटले आहे.

लग्नानंतर १५ दिवसांत भांडणाला सुरुवात

2008 मध्ये आमचे लग्न झाले. लग्नानंतरच्या काहीच दिवसांत आमच्यात भांडण सुरु झाले. तेव्हापासून आमच्यात वारंवार खटके उडतात.

तू सावळी आहेस, तुझी जात वेगळी आहे. तुझ्याशी लग्न करुन माझा काही एक फायदा झाला नाही.

तुझ्या वडिलांची पद सह सचिव गृह व वित्त विभागात आहेत बघून मी तुझ्याशी लग्न केले. परंतु त्याचा मला काही एक फायदा झाला नाही असे बोलला.

तेव्हा आमच्या दोघांमध्ये भांडण झाले होते, त्यावेळी मला मारहाण केली होती.

गजानन देत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासामुळे मला डिप्रेशनचा आजार सुरु झाला होता.

त्यावेळी सन 2009 मध्ये दादर येथील मानसोपचार पाठकर यांच्याकडे वर्षभर उपचार घेतले होते.

गजानन यांचे परस्त्रीयांसोबत अनैतिक संबंध असायचे.

त्याचा फोन मी पहिला असता फोन कॉल व मेसेज वरून मला समजायचे की, तो अनेक मुलींशी प्रेमाच्या अश्लील गोष्टी करत असायचा.

असे गंभीर आरोप गजानन काळे यांच्या पत्नीने त्यांच्यावर केले आहेत.

हे ही वाचलं का?

Back to top button