‘मुंबई डायरीज २६/११’ : दिग्दर्शक निखिल आडवाणी म्हणाले…

मुंबई डायरीज २६/११
मुंबई डायरीज २६/११

मुंबई; पुढारी ऑनलाईन : अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या बहुप्रतीक्षित 'मुंबई डायरीज २६/११' चा प्रभावी ट्रेलर रिलीज झाला आहे. गेटवे ऑफ इंडिया येथे ट्रेलर लाँच करण्यात आला. त्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. निखिल आडवाणी यांनी मुंबई डायरीजविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. निखिल आडवाणी दिग्दर्शित आहे.

अधिक वाचा-

एमी एंटरनेटमेंटच्या मोनिशा अडवाणी आणि मधू भोजवानी यांची निर्मिती आहे. आडवाणी आणि निखिल गोन्साल्विस यांचे सहदिग्दर्शन आहे.

अधिक वाचा-

मुंबई डायरीज २६/११ हा शो, डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिकल आणि रूग्णालय कर्मचाऱ्यांच्या बलिदानावर आधारित आहे. २६ नोव्हेंबर २००८ साली दहशतवादी हल्ल्या झाला होता. त्यादरम्यान लोकांचे जीव वाचवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांची अप्रकाशित कथा 'मुंबई डायरीज २६/११' मधून सादर करण्यात आली आहे.

अधिक वाचा-

या मालिकेमध्ये कोंकणा सेन शर्मा, मोहित रैना, टिना देसाई यांच्या भूमिका आहेत. श्रेया धन्वंतरी, सत्यजित दुबे, नताशा भारद्वाज, मृण्मयी देशपांडे, प्रकाश बेलावडी यांसारखे गुणी कलाकार आहेत.

आडवाणी यांना काही फ्रंटलाइन वॉरियर्स सोबत बोलण्याची संधी मिळाली. ज्यांनी २६/११ च्या आतंकवादी हल्ल्यानंतर मुंबई शहराला वाचवले. त्यांच्या प्रेरक कहाण्या समजून घेतल्या.

निखिल म्हणाले, मी एक मुंबईकर आहे. माझे या शहरावर प्रेम आहे. हे शंभर टक्के खरे आहे की हे शहर कधीच हरत नाही. कधी झोपत नाही. मात्र, आपण त्या लोकांना विसरून जातो. जे यासाठी जबाबदार असतात. जेव्हा मी आणि अपर्णा एका शोबाबत विचार करत होतो. तेव्हा आम्ही एक वैद्यकीय नाट्य करण्याचा विचार केला.

मी तिला सांगितले की, चल आपण त्या लोकांविषयी मांडूयात. जे सतत युद्धात कार्यरत असतात. आम्ही 'मुंबई डायरीज'मध्ये हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अतुलनीय नायकांच्या कथा सांगण्यासाठी ज्याबद्दल खरोखर कोणी बोलत नाही. त्यांना खूप हलक्यात घेतले जाते.

मुंबई डायरीज २६/११
मुंबई डायरीज २६/११

निखिल म्हणाले…

सत्य कल्पनेपेक्षा पूर्णतः वेगळे आहे. माझा कल नेहमीच वास्तविक जीवनातील कहाण्यांकडे राहिला आहे. तुम्हाला केवळ असे लोक आणि त्यांच्या अविश्वसनीय कथा ऐकायच्या आहेत. मी खूप भाग्यवान आहे. मला असे करण्याची संधी मिळत आहे आणि यासाठी अमेझॉन प्राईम व्हिडिओचे धन्यवाद.

मुंबई डायरीज २६/११ हे त्या भयानक, अविस्मरणीय रात्रीवर आधारित आहे. एक काल्पनिक वैद्यकीय नाट्य आहे. ज्याने एकीकडे शहर उद्ध्वस्त केले. परंतु दुसरीकडे येथील लोकांना एकत्र केले. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपला मार्ग कणखर केला.

हेदेखील वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news