![हॉट मल्लिका ‘साडीवाल्या बिकीनी’त दिसते आणखी हॉट](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F09%2F%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई; पुढारी ऑनलाईन: 'मर्डर' फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत बोल्ड अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सध्या अशाच एका बिकीनीवाल्या साडीतील लूकने पुन्हा ती चर्चेत आली आहे.
नुकतेच मल्लिका शेरावत विदेशातून मुंबईत आली. एका 'कॉमेडी शो'मध्ये जज करण्यासाठी ती सेटवर पोहोचली. मल्लिका सेटवर जातानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एका 'कॉमेडी शो'च्या सेटवर मल्लिका व्हॅनिटी व्हॅनमधून पोहोचली आहे. यावेळी मल्लिकाने बिकीनीसारखी निळ्या रंगाची साडी नेसली आहे. या साडीत ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कॉमेन्टस केल्या आहे. यात एका युजर्सने 'साडीसारख्या सुंदर व सौज्वळ पोशाखाला पूर्णपणे बर्बाद केलं आहेस. फॅशनच्या नावावर हे अतिचं झाले आहे', तर दुसऱ्या एका युजर्सने 'प्लीज साडीला आता तरी एकटं सोडा, इतक्या सुंदर पोशाखाची नुसती वाट लावली' असे म्हटले आहे.
याशिवाय आणखी एका युजर्सने 'प्लीज ही साडी आहे, असं म्हणू नका,' अशा शब्दांत मल्लिकाची खिल्ली उडवली. या सगळ्यावरून मल्लिकाच्या साडीची सोशल मीडियात चर्चांना उधान आल्याचे दिसते आहे.
याआधी मल्लिकाने विदेशातून Sunkissed च्या फोटोंनी धुमाकूळ घातला होता. मल्लिका शेरावत नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असून आपले हॉट लूकचे फोटो शेअर करत असते. मल्लिका शेवटची 'जीनत' या चित्रपटात दिसली होती. यानंतर ती 'द स्टोरी' आणि 'बू सबकी फटेगी' या वेबसीरिजमध्ये झळकली.
हेही वाचलंत का?