सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरीवर शालिनीनं उचलला हात

सुख म्हणजे नक्की काय असतं : गौरीवर शालिनीनं उचलला हात
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका सध्या चर्चेत आहे. पूर्वीपासूनचं गौरी विरोधात कुरघोडी करणारी शालिनी आता चांगलीचं भडकलीय. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेमध्ये शालिनीने गौरीवर हात उचललाय. पण, गौरीने तिला रोखून धरलंय आता याचं भांडण टोकाला जाणार का? असा प्रश्न सर्वांना पडलाय.

अधिक वाचा-

साधी, सरळ गौरी आता संतापली आहे. जयदीपच्या पाठिंब्यामुऴे गौरीमध्ये इतकी हिंमत आली आहे, असे शालिनीला वाटतंय. शालिनीसोबत देवकी आणि ज्योतिका या दोघी आहेत. म्हणजेच, शालिनी, देवकी आणि ज्योतिका यांच्या विरोधात गौरी एकटी खंबीरपणे उभी आहे.

अधिक वाचा-

या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू हिने गौरी ही व्यक्तीरेखा साकारली आहे. यामध्ये सुरुवातीला मोलकरीण म्हणून काम करत असते. सर्वांची बोलणी ऐकून घेत असते. सर्वांचा अपमान सहन करत असते. पण, घरातील तरुण जयदीपशी तिचं लग्न होतं.

अधिक वाचा-

हळूहळू गौरीला तिच्या अस्तित्वाची जाणीव होते. पण, घरातील शालिनी नेहमी तिच्या विरोधात असते. ती सतत काही ना काही कुरघोड्या करते. गौरीला त्रास देण्याचा तिचा मानस असतो.

पण, आता गौरी समर्थपणे लढायला तयार आहे. गिरीजाने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा या मालिकेचा महाएपिसोड असणार आहे. रविवार ५ सप्टेंबर रोजी का घडणार याचा व्हिडिओ गिरीजाने शेअर केला आहे.

यामध्ये दाखवलंय की, शालिनी तिला म्हणते-लई चुरूचुरू बोलायला लागली गं तू. माझा हात पकडण्याची हिम्मत कशी झाली तुझी. जयदीप भावोजींचा समर्थन आहे हिला. हिंमत असेल तर एकटी लढ.

गौरी म्हणेते – आता सामना होऊनचं जाऊ दे. तिघी व्हर्सेस गौरी जयदीप शिर्के-पाटील.

गौरी जयदीप शिर्के-पाटील विरुद्ध शालिनी, देवकी आणि ज्योतिका. या तिघींमध्ये सामना होताना या मालिकेत दिसणार आहे. गौरी या तिघींविरोधात काय पाऊल उचलते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

गिरीजाविषयी जाणून घ्या –

मुख्य भूमिका असलेली गिरीजाची ही पहिलीच मालिका आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबत काम करत आहे. तिच्या स्वभावाने घरातील अनेकांची मने आणि विश्वास जिंकण्यास ती यशस्वी ठरलीय.

गिरीजा खऱ्या आयुष्यात ऑलराऊंडर आहे. ती उत्तम अभिनेत्री आहे. तसेच ती प्रोफेशनल डान्सरसुद्धा आहे. झी युवा वाहिनीवरील 'युवा डान्सिंग क्वीन' या रिअॅलिटी शोमध्ये तिने सहभाग घेतला होता.

याव्यतिरिक्त तिला चित्रकलेचीही आवड आहे. मंडाला आर्टचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. गिरीजा योगादेखील करते. गिरीजा फिटनेसला प्रचंड महत्व देते.

हेदेखील वाचलंत का-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news