मुंबई आणि उपनगरात मुसळधार, वाहतूक आणि लोकल सेवा विस्कळीत

गेल्या दोन दिवसांपासून रिपरिप सुरु असलेल्या मुंबई शहरात व उपनगराला पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे चार ते सात या अवघ्या तीन तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीला फटका बसला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून रिपरिप सुरु असलेल्या मुंबई शहरात व उपनगराला पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे चार ते सात या अवघ्या तीन तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीला फटका बसला आहे.
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने अवघ्या काही तासांतच वाहतूक आणि लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रिपरिप सुरु असलेल्या मुंबई शहरात व उपनगराला पहाटे पावसाने जोरदार हजेरी लावली. पहाटे चार ते सात या अवघ्या तीन तासांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतुकीला फटका बसला आहे.

सखल भागांत पाणी तुंबल्याने लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. गेल्या २४ तासांत मुंबई पूर्व व पश्चिम उपनगरात १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.

अधिक वाचा : 

१०० मिमी पावसाची नोंद

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहरात पहाटे ४ ते ७ या वेळेत ३६ मिमी, पूर्व उपनगरात ७५ मिमी आणि पश्चिम उपनगरात ७३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

मध्य रेल्वेच्या मेन व हार्बर लाईनवरील सायन आणि कुर्ला स्थानकांवरील ट्रॅकवर पाणी भरल्याची माहिती प्रवाशांनी दिली.

कुर्ला ते विद्याविहार दरम्यान ट्रॅकवर पाणी साचल्याने धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.

त्यामुळे या मार्गासह हार्बर मार्गावरील लोकल सेवा २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होती.

अधिक वाचा :

याउलट ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा सुरळीत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.

पावसाचा फटका रस्ते वाहतुकीलाही बसला आहे. लाल बहाद्दूर शास्त्री अर्थात एलबीएस मार्गावर पाणी तुंबल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे.

हिंदमाता परिसरात काही प्रमाणात पाणी तुंबल्याने वाहतूक मंदावली आहे.

मात्र भूमिगत टाक्यांमुळे नेहमीप्रमाणे जास्त पाणी तुंबले नसल्याने वाहतूक ठप्प पडलेली नाही.

किंग्ज सर्कल येथील गांधी मार्केटमध्ये कंबरेभर पाणी तुंबल्याने महापालिकेचा दावा फोल ठरलेला आहे.

येथे काही वाहने बंद पडली असून वाहतूक संथ गतीने सुरु आहे.

अधिक वाचा : 

स्थलांतरीत नागरीक
स्थलांतरीत नागरीक

मिठी नदी परिसरातील नागरिकांचे स्थलांतर

पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक पोलिसांकडून कोंडी फोडण्याचा प्रयत्न सुरु आहे.

मिठी नदी शेजारी असलेल्या क्रांती नगरमधील नागरिकांच्या स्थलांतरला सुरुवात झाली आहे. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. साधारणतः 3.3 मीटर ही धोक्याची पातळी असताना मिठी नदीची सध्याची पातळी 3.6 झाली आहे.

मिठी नदीला लागून असलेल्या एक हजार ते बाराशे लोकांचे सुरक्षित पालिकेच्या शाळेत स्थलांतर करण्यास पालिकेने केली. सुरुवात, या वर्षी पहिल्यांदा मिठीने एवढी पातळी गाठली.

हे ही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news