बायोडाटा, सी.व्ही. आणि रिझ्युम यातील फरक माहीत आहे का?

file photo
file photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सगळीच नोकरीच्या सोधात असतात. नोकरी सोधण्यासाठी आपल्याकडे आपला बायोडाटा असणे गरजेच असते. हा बायोडाटा कशापध्दतीने तयार केला आहे. हे महत्वाचं असते.

पण या बायोडेटाला काहीजण सीव्ही म्हणतात. तर काहीजण रिझ्युम म्हणतात. खरतर बायोडाटा आणि सीव्ही, रिझ्युम या तीनही गोष्टी वेगळ्या आहेत.

व्यावसायिक जगामध्ये पाऊल ठेवताना अथवा नोकरीसाठी अर्ज करताना बायोडाटा (Bio-data), रिझ्युम (Resume) की CV अर्थात Curriculum Vitae यामध्ये नक्की काय फरक आहे, असा प्रश्न पडतो.

काहीजणांना असेही वाटते की एकच तर आहे सगळे. परंतु काही वेळा यामुळे आपल्या हातातली चांगली संधी देखील जाऊ शकते.

बायोडाटा (Bio-data), रिझ्युमे (Resume) सीव्ही ( Curriculum Vitae) यातील नेमका फरक काय आहे ते पाहुया.

बायोडाटा (Bio-data)

file photo
file photo

बायोडाटा म्हणजेच बायोग्राफिकल डाटा. बायोडाटा बनवत असताना हा एक ते तीन पानांमध्ये बनवायचा असतो. बायोडाटा (Bio- data) हा शब्द Resume किंवा Curriculum Vitae ला पर्यायी जुना शब्द आहे.

यामध्ये शिक्षण आणि कामाच्या अनुभवासोबतच आपली वैयक्तिक माहिती जसे की जन्म तारीख, लिंग, धर्म, जात, घरचा पत्ता, राष्ट्रीयत्व इ. असते.

बायोडाटा मध्ये रिझ्युमेपेक्षा (Resume) पेक्षा बरीच अधिक माहिती नमूद केलेली असते. त्यामुळे उमेदवाराची वैयक्तिक पार्श्वभूमी देखील समजू शकते. बायोडाटा हा शासकीय नोकरीसाठी अर्ज करताना बायोडाटा दिला जातो.

बायोडाटाचा वापर सर्वात जास्त हा विशेषतः लग्न जमवण्यासाठी बनवल्या जाणार्‍या माहिती पत्रकालाही बायोडाटा म्हणतात.

पण एखाद्या मुलाखतीसाठी बाययोडाटाची मागणी केली जाते. नोकरीसाठीच्या बायोडाटा हा वेगळा असतो. यात सुरुवात आपण आपल्या करिअर मधील ध्येय मांडू शकतो.

त्याशिवाय आपण अर्ज करत असलेली जागा आपल्यासाठी कशी योग्य आहे हे देखील मांडता येते. हा बायोडाटा असल्याने आपण यात आपली वैयक्तिक माहिती नमूद करू शकतो.

यानंतर कामाचा अनुभव, आतापर्यंत घेतलेल्या प्रत्येक कामाच्या अनुभवाबद्दल मग तो अनुभव संबधित नसला तरीदेखील तुम्ही इथे नमूद करणे अपेक्षित असते.

यामध्ये तुमच्या कामाच्या ठिकाणच्या दररोजच्या जबाबदार्‍या देखील नमूद करायच्या आहेत. याशिवाय कामाच्या अनुभवाशिवाय असलेली कौशल्ये जसे की एखादे सॉफ्टवेअर हाताळणे, एखादी भाषा इ. नमूद करायचे. सर्वात शेवटी आपली शैक्षणिक माहिती नमूद करायची आहे.

रिझ्युम (Resume)

file photo
file photo

रिझ्युम मध्ये आपले शिक्षण, कौशल्ये आणि अनुभव हे सर्व सारांश रूपात मांडलेले असतात. बहुतांश रिझ्युम हे एक ते दोन पानांचे असतात.

यामध्ये अगदी प्रत्येक अनुभव अथवा माहिती नमूद करण्यापेक्षा ज्या नोकरीसाठी आपण अर्ज करत आहोत फक्त त्या संबंधित असलेला आपला अनुभव, कौशल्य थोडक्यात लिहायचे असते.

आपण मुलाखत देत असताना आपल्याकडून रिझ्युम जेव्हा मागवला जातो तेव्हा संक्षिप्त माहिती अपेक्षित असते.

अनुभव, ध्येय, शैक्षणिक अर्हता, पूर्ण केलेले प्रोजेक्ट, कौशल्ये, आवड असलेले क्षेत्र अशा क्रमाने ही माहिती नमूद केलेली असावी.

आपली माहिती मोजक्याच शब्दात लिहायची असतात. जेणेकरुन मुलाखत घेणाऱ्याचे रिझ्युमे लगेच नजरेस पडेल. मुलाखत घेणार्‍याला रिझ्युम निवडण्यासाठी फार वेळ घालवायचा नसतो.

त्यामुळेच आपली कौशल्ये अगदी मोजक्या शब्दात तसेच वाचण्यास सोपी अशी एका खाली एक नमूद केली, तर ती मुखात घेणार्‍याच्या लवकर नजरेत येतील रिझ्युमे निवडला जाण्याची शक्यता वाढेल.

सी.व्ही. (Curriculum Vitae)

file photo
file photo

सी.व्ही Curriculum Vitae म्हणजेच CV या नावातच आपल्याला समजते की यामध्ये विस्तृत माहिती द्यायची आहे. सी.व्ही ला पानांची तशी काही मर्यादा नसते. तो दोन ते तीन पानांचा अथवा त्यापेक्षाही मोठा असू शकतो.

सामान्यतः शैक्षणिक संस्था, रिसर्च संस्था इ. ठिकाणी सी.व्ही. मागवतात. अर्थातच सी.व्ही. मध्ये शैक्षणिक माहिती, अगदी आपण केलेले प्रोजेक्ट, रिपोर्ट, रिसर्च सर्व काही नमूद करता येते. सी.व्ही. मध्ये आपली सर्व माहिती विस्तूत मांडली जाते.

हे ही वाचलत का :

हे पाहा :

कोल्हापूरचा पाणीपुरवठा कधी सुरू होणार ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news