बजरंग पुनियाचा सेमीफायनलमध्ये पराभव, कांस्यपदकासाठी खेळणार

बजरंग पुनिया
बजरंग पुनिया
Published on
Updated on

टोकियो ऑलिम्पिक; पुढारी ऑनलाईन : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याचा फ्रीस्टाइल ६५ किलो वजनी गटाच्या सेमीफायनलमध्ये पराभव झाला. बजरंग पुनिया याला अझरबैजानच्या हाजी अलियेवने १२-५ अशा गुण फरकाने हरवले. सेमीफायनलमध्ये पराभव झाला असला तरी बंजरग आता शनिवारी कांस्यपदकाच्या लढतीत खेळणार आहे.

बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या मोर्टेझा चेका घियासी याला चितपट केले होते. पण त्याला सेमीफायनलमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

तर १/८ च्या फेरीत बजरंगने किर्गिझस्तानच्या एर्नाझर अकमातलीव याचा पराभव केला होता. त्यानंतर बजरंगने उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या कुस्तीपटूला मात दिली होती.

बजरंग पुनियाकडून भारताला पदकाची आस आहे.

काल गुरुवारी (दि.६) ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी कुमार दहियाने रौफ्यपदक कामगिरी केली.

सुवर्णपदकाच्या लढतीत दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या रशियाच्या जावूर युग्युयेव्हने रवी कुमार दहिया याच्यावर ७-४ गुणांनी मात केली. अंतिम फेरीत पराभव झाला असला तरी त्याने झुंझार खेळाचे प्रदर्शन केले.

रवीने २०२० आणि २०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर त्याने २०१८ च्या अंडर-२३ चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकले होते.

विनेश फोगटकडून निराशा…

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगट क्वार्टर फाइनलमध्ये पराभूत झाली. बेलारुसच्या वानेसा कालाडझिन्स्काया हिने विनेश फोगट हिला ९-३ असे हरवले.

या सामन्यापूर्वी विनेश हिची लढत स्वीडनची सोफिया मॅटसन हिच्याशी झाली होती. या सामन्यात तिने मॅटसनला ७-१ ने पराभूत केले होते.

दीपक पुनियाचे कांस्यपदक शेवटच्या २० सेकंदात हुकलं…

भारतीय कुस्तीपटू दीपक पुनियाला (८६ किलो वजनी गट) टोकियो २०२० च्या कांस्य पदकाच्या कुस्ती सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

शेवटच्या २० सेकंदात हा सामना फिरला. सॅन मारिनोचा पैलवान नाझम मायलेस अमाईन विरुद्ध २ गुण गमावून दिपकला कांस्यपदकापासून दूर रहावं लागलं आहे. नाझमने दिपकविरुद्धचा हा सामना ४-३ गुणांनी जिंकला. तो कांस्यपदकाचा विजेता ठरला.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : महाराष्ट्राचे सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news