निखळ प्रेमाची ओळख करून देणारा “काटा किर्रर्र”

निखळ प्रेमाची ओळख करून देणारा "काटा किर्रर्र" यादिवशी भेटीला
निखळ प्रेमाची ओळख करून देणारा "काटा किर्रर्र" यादिवशी भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : असं म्हणतात की, प्रेमाला जात, पात, वर्ग, कुळ असलं काहीच नसतं, प्रेम ही साधी निखळ भावना असते आणि ती भावना ज्याला कळते, त्यालाच प्रेमाचा खरा अर्थ समजतो. अशाच एका सुंदर प्रेमाची गोष्ट घेऊन जितेंद्र वायकर दिग्दर्शित "काटा किर्रर्र" हा आगामी चित्रपट आपले मनोरंजन करायला सज्ज झाला आहे. शिवम क्रिएशन प्रस्तुत "काटा किर्रर्र" हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेम, करियर आणि त्यासाठी करावा लागणार संघर्ष या सगळ्यांची सांगड घालणाऱ्या या चित्रपटामध्ये आपल्याला नवोदित कलाकारांचा उत्तम असा अभिनय सुद्धा बघायला मिळणार आहे.

प्रेम करण्यासाठी कधीच कसल्याच गोष्टींच्या बंधनाची गरज नसते आणि जिथे कोणत्याही प्रकारचे बंधने येतात. तिथे प्रेम कधीच होत नाही. या गंभीर अशा विषयावर जितेंद्र वाईकर यांनी आपल्या दिग्दर्शनाची बाजू चांगल्या पद्धतीने धरून ठेवली आहे. सतीश देवकर यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. सतीश देवकर स्वतः या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमधून बघायला मिळणार आहे.

स्नेहा कुडवाडकर, कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, विशाल चव्हाण आणि प्राजक्ता गायकवाड यांसारखे दमदार कलाकारसुद्धा आपल्या भेटीला येणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे दमदार 'काटा किर्रर्र' हे गाणं सोशल मीडियावर गाजत आहे. या तडफदार गाण्याला आनंद शिंदे यांनी आवाज दिला आहे. प्रेम आणि करिअर या दोन विरुद्ध गोष्टींपैकी आपण कोणत्या गोष्टीला निवडायचं आणि या दोन गोष्टींचा विचार करताना आपण घेतलेला निर्णय हा कितपत योग्य ठरतो, हे सार काही आपल्याला या चित्रपटामधून पहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news