श्रीनगर: पुढारी ऑनलाईन : जम्मू-काश्मीरमध्ये आज 'सीआरपीएफ' ( CRPF) च्या तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 'सीआरपीएफ'चा (CRPF) एक जवान जखमी झाला आहे.
दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यामधील जैनपोरा गावातील क्रालचक परिसरात केंद्रीय राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) तुकडी गस्त घालत हाेती.
यावेळी दहशतवाद्यांनी या तुकडीवर अंदाधूंद गोळीबार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. त्याला लष्कराच्या इस्पितळात दाखलकरण्यात आले आहे.
सोमवारी अनंतगामध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भाजपचे सरपंच आणि त्यांची पत्नी ठार झाली होती. हा हल्ला लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी केला होता.
हल्ल्यात ठार झालेले सरपंच हे कुलगाम जिल्ह्यातील होते. त्यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.
यानंतर त्यांना पोलिसांनी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वीचे ते अनंतनागमधील आपल्या घरी परत आले होते.
पोलिसांनीही त्यांना घरी राहण्याची परवानगी दिली होती. त्यांना पोलिस संरक्षणही देण्यात आले होते. मात्र सुरक्षेसाठी दिलेला पोलिस कर्मचारी हल्लावेळी गैरहजर होता, असे तपासात स्पष्ट झाले आहे.
हेही वाचलं का?